HW News Marathi
महाराष्ट्र

फोन टॅपिंगचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर, अनेकांचे बिंग फुटणार – देवेंद्र फडणवीस

नागपूर | पोलीस दलातील बदल्यांबाबतचा फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे बिंग फुटणार असल्यानेच राज्यातील नेते अस्वस्थ आहेत, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज (२७ मार्च) माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर झाला आहे. त्यातून अनेकांचे बिंग फुटणार आहे.

त्यामुळेच अनेकजण अस्वस्थ झाले आहेत, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र पोलीस दलाची बदनामी करण्याचं काम कुणी केलं? वाझे सारख्या निलंबित अधिकाऱ्याला सेवेत घेऊन त्याच्याकडे महत्त्वाच्या केसेस देण्यात आल्या. वाझे सारख्यांना सेवेत घेऊन सिंडिकेट राज चालवण्यात आलं. त्यामुळे पोलीस बदनाम झाले की पोलिसांचं नाव झालं ते सांगा? असा सवाल त्यांनी केला आहे.

सावंतांना काय उत्तर द्यायचं?

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. यावेळी फडणवीसांनी सावंतांची अक्षरश: खिल्ली उडवली. सचिन सावंतांना मी काय उत्तर द्यायचं. त्यांना काही समजतं तरी का? त्यांना उत्तर द्यायला आमचे राम कदम आहेत. ते रोज काहीही बोलत असतात. असं रोज काहीही बोलणाऱ्यांना मी थोडीच उत्तर देणार? असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

वाझेंचे बोलविते धनी चिंतेत

एनआयएच्या चौकशीमुळे आघाडीतील लोक अस्वस्थ आहेत. नवाब मलिक आणि त्यांचे सहकारी घाबरले आहेत. वाझे काय बोलणार याची त्यांना भीती वाटत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे वाझेंचे बोलविते धनी चिंतेत आहेत, असंही ते म्हणाले. मी केवळ फोन टॅपिंग प्रकरणाचे दोन पाने दिली होती. मलिक यांनी अख्खा अहवाल देऊन अहवाल फोडला, असा दावाही त्यांनी केला.

डीव्हीआरचा बॅकअप मेन सर्व्हरला

पोलिसांच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर कुणीही गायब केली तरी त्याचा बॅकअप मेन सर्व्हरला आहे. प्रायव्हेट डीव्हीआर नष्ट करणं सोपं आहे. पण पोलिसांचा डीव्हीआर गायब करणं सोपं नाही. त्यामुळे त्याचे पुरावे मिटणार नाहीत. तशी व्यवस्थाच करून ठेवली आहे, असंही ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नगर जिल्ह्यात बहरली सफरचंदाची बाग, सुहास वाबळेंचा यशस्वी प्रयोग

News Desk

नीरा-देवघर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता; माढा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अनेक निर्णय

Aprna

राज ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीकडे आधी दुर्लक्ष नंतर घेतली कडक अॅक्शन

News Desk