HW News Marathi
Covid-19

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा होम आयसोलेशनचा निर्णय सरकारने केला रद्द – राजेश टोपे

मुंबई | राज्यात सध्या कोरोना पाठोपाठ काळी बुरशी अर्थात म्युकोसायकोसिस या आजाराचेही रुग्ण वाढताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमिवर आज (२५ मे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत आणि पोलिस अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत म्युकरमायकोसिस आणि कोरोना बाबत चर्चा झाल्याची माहिती राज्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी राजेश टोपे यांनी सांगितलं की सध्या राज्यात म्युकरमायकोसिसचे 2245 रुग्ण आहेत.

म्युकरमायकोसिसचा महात्मा ज्योतीबा फुले योजनेअंतर्गत होणार मोफत उपचार

यामध्ये नोटीफाएबल डिसीझ म्हणून म्युकरमायकोसिसला आरोग्य विभागाने मान्यता दिल्याचंही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं आहे. याचा अर्थ म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाला त्याची माहिती दिसत त्याच्या उपचाराची माहिती उपलब्ध मिळणार आहे. म्युकरमायकोसिससाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा ताबा Government Of India कडे आहे. त्याचे वाटप राज्यात आणि जिल्ह्यांत त्या पद्धतीने केले जाणार आहे. दरम्यान, ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या आहे त्याची माहिती IDSP या वेबपोर्टवर अपडेट करणे गरजेचे असणार आहे. त्याच्या सुचना कलेक्टरांना दिल्या आहेत.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये म्युकरमायकोसिस मोफत झाले पाहिजे. याचा जी आर काढण्यात आला असून बजेटमधून ३० कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे विमाच्या दीड लाखाचा जो कवच असतो त्यापैकी वरची लागणारी रक्कम दिली जाणार असल्याचंही यावेळी राजेश टोपे यांनी सांगितलं आहेत. यातुन १३१ रुग्णालये यासाठी नोटीफाईड केले आहेत. २२०० पैकी जवळजवळ १००७ रुग्ण हे महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार घेत आहेत. तसेच, ज्या खासगी रुग्णालयामध्ये लोकं म्युकरमायकोसिसचा उपचार घेतलं आहेत त्याठिकाणीही मोफत उपचार किंवा कमी रेटिंग व्हावं अशी सरकारची इच्छा असल्याचंही टोपे म्हणाले आहेत.

होम आयसोलेशन बंद

पुढे त्यांनी महाराष्ट्रातील कोरोना स्थितीबाबत माहिती दिली. कोरोनाची स्थिती सध्या आटोक्यात आहे. बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. पॉझिटीव्हिटी रेट १२ टक्क्यांच्या खाली आला आहे. आणि मृत्यूचं प्रमाण १.५ टक्के झाले आ्हे. आजच्या १८ जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बातचीत झाली त्यात होम आयसोलेशनबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय राजेश टोपे यांनी सांगितलं असून कोविड केअर सेंटर वाढणण्याचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

गावागावात कोविड केअर सेंटर उभारा

दुसरी महत्वाची बाब म्हणजे, वित्तमंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीसाठी जो निधी दिला जातो त्यातून २५ टक्के खर्च हा कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी द्यावा अशी सूचना देण्यात आली आहे. ज्यात २५ ते ३० आयसोलेटेड बेड्स असतील असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

टेस्टींग फोकस पद्धतीने वाढवा

तसेच, टेस्टींग ही फोकस पद्धतीने वाढवली पाहिजे असंही ते म्हणाले. याचा अर्थ जो पॉझिटीव्ह रुग्ण असेल त्याचे हायरिस्क आणि लॉ रिस्क कॉन्टटॅक्ट यामध्येच टेस्टींग झाली पाहिजे. कुठेही जाऊन टेस्ट करत पॉझिटीव्हीटी रेट कमी करु नये अशा सूचनाही यावेळी देण्यात आले आहेत. तसेच आशा वर्कर्स यांनाही खास ट्रेनिंग देऊन टेस्टींगमध्ये त्यांना सामिल करण्याचे ठरवले आहे. एक म्हणजे रेपिड एन्टीजन टेस्ट आणि दुसरी सेल्फ टेस्टींग किट्स जी कोविशिल्डची आली आहे त्याचं ट्रेनिंग देण्याचं ठरवलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यूझीलंडने अशी केली कोरोनावर यशस्वी मात

News Desk

धारावीत ३४ नवे कोरोनाग्रस्त, एकूण संख्या २७५ वर

News Desk

पुण्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १०० वर

News Desk