HW News Marathi
Covid-19

मोठी बातमी ! Twitter India च्या कार्यालयांवर दिल्ली पोलिसांचे छापे

नवी दिल्ली । देशासाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. दिल्ली पोलिसांनी ‘ट्विटर इंडिया’च्या कार्यालयांवर छापे टाकले आहेत. नवी दिल्लीतील लाडो सराय आणि गुडगाव भागांतील ‘ट्विटर इंडिया’च्या कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात आल्याचे वृत्त आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने हे छापे टाकले आहेत.

अवघ्या काहीच दिवसांपूर्वी भाजपकडून काँग्रेसवर टूलकिट प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. याच आरोपांप्रकरणी ‘ट्विटर इंडिया’च्या कार्यालयांवर ही छापेमारी करण्यात आल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने पीटीआय ही माहिती दिली आहे.

काय आहे ‘टूलकिट’ प्रकरण ?

पंतप्रधान मोदी यांना बदनाम करण्यासाठी काँग्रेसकडून अगदी पद्धतशीरपणे एका ‘टूलकिट’चा वापर होतोय असा अत्यंत गंभीर आरोप भाजपच्या नेत्यांनी काहीच दिवसांपूर्वी केला आहे. भाजपच्या या खळबळजनक आरोपानंतर #CongressToolkitExposed हा हॅशटॅग देखील ट्रेंड झाला. मात्र, भाजपचे हे सर्व आरोप पूर्णपणे तथ्यहीन, खोटे असल्याचे सांगत हे सर्व आरोप फेटाळून लावत काँग्रेसने पोलिसांत धाव घेतली आहे. दरम्यान, देशातील गंभीर कोरोनास्थितीच्या अपयशी हाताळणीवरून काँग्रेसकडून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर सातत्याने जोरदार टीका, आरोप-प्रत्यारोप झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणेकरांनो लॉकडाऊन होणार नाही मात्र निर्बंध कडक केले जाणार!

News Desk

सचिन तेंडुलकरनंतर आता युसुफ पठाणलाही कोरोनाची लागण

News Desk

विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याचा अठ्ठाहास कशासाठी आणि कोणासाठी ?, राज ठाकरेंचा पत्रातून राज्यपालांना सवाल

News Desk