HW News Marathi
Covid-19

स्पुटनिक-व्ही लसीचे उत्पादन भारतात सुरू

नवी दिल्ली | देशात कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरण जोरदार सुरू आहे. कोविशिल्ड आणि COVAXIN या २ लसी सद्या दिल्या जात आहेत. यात आणखी एका लसीची भर पडणार आहे. स्पुटनिक या लसीचे उत्पादन भारतात सूरु झाले आहे.

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि ड्रग फर्मा पॅनासिआ बायोटेक यांनी भारतात स्पुटनिक-व्ही लसीच्या उत्पादनास सुरुवात केली आहे. भारतातील पॅनेसिया बायोटेक आता दरवर्षी स्पुटनिक-व्ही लसीचे १० कोटी डोस उत्पादन करणार आहे.

पॅनेसीआ बायोटेकमध्ये उत्पादीत केलेली लस गुणवत्ता नियंत्रणासाठी पाठविली जाईल, असे स्पुटनिक व्ही निर्मात्यांनी आज (२४ मे) एका निवेदनात म्हटले आहे. पॅनेसिया बायोटेकच्या भागीदारीत भारतात उत्पादन सुरू केल्याने देशाला साथीच्या रोगाचा सामना करण्यास मदत करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असे आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव्ह म्हणाले आहेत.

आरडीआयएफने भारतात कोट्यवधी स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करण्यासाठी हेरो, ग्लॅंड फार्मा आणि स्टीलिस बायोफर्मा या अन्य भारतीय फर्मा कंपन्यांशी भागीदारी केली आहे.ऑगस्ट २०२० मध्ये रशिया हा कोरोना व्हायरसवरील लस नोंदविणारा जगातील पहिला देश ठरला आहे. डॉ. रेड्डी यांना आरडीआयएफकडून दोन लाखाहून अधिक लसी मिळाल्या आहेत. स्पुटनिक-व्ही च्या लसीकरणासाठी अपोलो हॉस्पिटलशी करार करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नाहीतर ५००० प्रवास भत्ता द्या”, भाजपची मागणी

News Desk

मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे! – प्रा.वर्षा गायकवाड

Aprna

राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला तर कोरोनामुक्तांचा आकडा दुप्पट

News Desk