HW News Marathi
Covid-19

मंत्री धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण

मुंबई । राज्यातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. वाढता कोरोनाबाधितांचा आकडा राज्य सरकारची चिंता वाढवतो आहे. याच पार्श्वभूमीवर, एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांनी आज (२३ मार्च) थोड्याच वेळापूर्वी स्वतः याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

मंत्री धनंजय मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, “माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती.मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही”, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी”, असे आवाहनही यावेळी धनंजय मुंडे यांनी केले आहे. दरम्यान, यापूर्वी धनजंय मुंडेंना १२ जून २०२० रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी धनंयज मुंडेंना श्वास घेताना त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढे २२ जून २०२० रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांना घरी सोडण्यात आले होते.

धनंजय मुंडेंनी त्यावेळी कोरोनावर यशस्वी मात केली होती. मात्र, त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून लसीकरण केलं म्हणजे उपकार नाही”, रोहित पवारांची टीका

News Desk

पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या ‘त्या’ घटनेनंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना आढावा बैठकीत व्यक्त केला खेद

Aprna

Covishield घेऊनही Antibodies तयार नाहीत, अदार पुनावालांविरोधात दाखल केली तक्रार

News Desk