नवी दिल्ली | राज्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांनी वातावरण तापलेलं असतानाच आता नव्या वाद उभा राहण्याची चिन्हं आहेत. खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्यावर धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर सावंत यांनी खुलासा करत आरोप फेटाळून लावला. मात्र, आता नवनीत राणा आक्रमक झाल्या असून, सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचं राणा यांनी म्हटलं आहे.
राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी धमकावल्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. या आरोपांवर खासदार सावंत यांनी भूमिका स्पष्ट केली. मात्र, आता नवनीत राणा यांनी गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. “आपण तक्रार दाखल करणार (शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्याविरुद्ध) आहे,” असं नवनीत राणा यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं.
I will lodge a Police complaint (against Arvind Sawant): Maharashtra MP Navneet Rana
She had yesterday written to Lok Sabha Speaker alleging that Shiv Sena MP Arvind Sawant threatened her in Parliament premises after she raised Sachin Waze case in the House. pic.twitter.com/ImYpwxqnXa
— ANI (@ANI) March 23, 2021
नवनीत राणांची तक्रार काय आहे?
खासदार राणा यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केलेली आहे. “महाराष्ट्रात सुरु असलेलं मनसुख हिरेन हत्या प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, तसेच मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रावरुन ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ते प्रश्न मी संसदेत उपस्थित केले. एक महिला खासदार होण्याच्या नात्याने महाराष्ट्रातील बिघडत असलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ठाकरे सरकारविरोधात संसदेत आवाज उठवला. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला धमकी दिली. ‘तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू’, अशा शब्दात त्यांनी मला धमकावलं. यापूर्वी शिवसेनेच्या लेटरहेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे,” असं राणा यांनी म्हटलेलं होतं.
अरविंद सावंत काय म्हणाले होते?
खासदार अरविंद सावंत म्हणाले,”हे खोटं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की, त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. त्यांना समजावून सांगत असतो. पण, त्यांना धमकावलं हे साफ खोटं आहे. उलट त्याच (नवनीत राणा) सगळ्यांना धमकावत असतात.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.