मुंबई | राणे कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यातील वाद सगळ्यांना ठाऊक आहेच. राणे पिता पुत्र उद्धव ठाकरे यांच्यावर कायम वैयक्तिक टीका करत असतात. आता पुन्हा एकदा भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (२१मे) तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरचा कोकण दौरा करणार आहेत. याच दौऱ्यावरून नितेश राणे यांनी टिका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा दौरा म्हणजे केवळ दिखाऊपणा आहे. लिपस्टिक लावल्यावर सगळं कसं छान सुंदर आहे हे दाखवलं जातं आणि तोंड धुतल्यावर सगळं निघून जाते, तसा हा प्रकार असल्याची टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा कोकणातील वस्तुस्थिती सरकारपुढे मांडण्यासाठी होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याने काहीही साध्य होणार नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही खरमरीत टीका केली आहे.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सर्व कारभार देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्यावा. मग आम्ही किती मदत आणून दाखवतो, ते बघा. एवढी हिंमत तुमच्यात आहे का? मनगटात हिम्मत असावी लागते. नुसता टोप (केसांचा) घालून कुणी हिरो होत नाही (उदय सामंत यांना टोला). सरकारमध्ये वजन लागते. तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात, मदत आणून दाखवा, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
‘निसर्ग चक्रीवादळाच्यावेळी घोषणा झालेली मदत अजून मिळालेली नाही’
गेल्या निसर्ग चक्रीवादळ तुलनेत प्रचंड नुकसान सिंधुदुर्गाचे झालेलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडून अपेक्षा कशा ठेवणार ? मागचा अनुभव फार वाईट आहे. निसर्ग चक्रवादळाचे पैसे मिळाले नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काल मी माहिती घेतली 8 कोटी पैकीं फक्त 49 लाख मिळाले. आज मुख्यमंत्री पंचनामे करण्याचे आदेश देतात मग ते पंचनामे रद्दी भरण्यासाठी ठेवले आहेत का ? अधिकारी पर्यटनासाठी गावागावात फिरतात का ? मुख्यमंत्री उद्या कोकणात येऊन काय दिवे लावणार आहेत, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
या मुख्यमंत्र्यांकडून आमच्या जास्त अपेक्षा नाहीत. निसर्ग चक्रीवादळाचे पैसे मिळाले नाहीत तर आता काय देणार ते? उद्याचा त्यांचा दौरा फोटोसेशनसाठी आहे. फोटोग्राफरने फोटो काढायचे असतात, स्वतःचे फोटो काढून घ्यायचे नसतात…जर ते फोटो काढून घेण्यासाठी येत असतील ते काम त्यांनी घरी बसूनच करावे…इथे यायची गरज काय ? इथे येतच असाल तर राज्याच्या जनतेच्या दिलसासाठी पॅकेज जाहीर करतात..निसर्ग चक्तीवादळाची, तौक्ते चक्रीवादळाची मदत द्या. आमचं केंद्रात सरकार आहे. आम्ही सर्व महिती सरकारला दिली आहे. आमचे मुख्यमंत्री कमी पडले असले तरी नरेंद्र मोदी साहेबांकडून भरपूर मदत मिळेल याचा विश्वास असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
निलेश राणेंचाही प्रहार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता घराबाहेर पडतील तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज ठरेल, अशी खोचक टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली. उद्धव ठाकरे कधी घराच्याबाहेर पडणार, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले.
देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून निलेश राणे यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.