नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. सरकारच्या एखाद्या निर्णयावर नाराजी असो किंवा सल्ला द्यायचा असो ते नेहमीच आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसतात. नुकतंच त्यांनी लसीकरण वाढवण्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांना लसनिर्मितीसाठी परवाना देण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान यानंतर केंद्राने आधीच यासंबंधी निर्णय घेतला असून आपल्याला याची कल्पना नवह्ती अशी कबुली दिली आहे.
नितीन गडकरी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. “काल स्वदेशी जागरण मंचकडून आयोजित परिषदेत बोलताना मी लसनिर्मिती वाढवण्यासाठी सल्ला दिला होता. माझ्या भाषणाआधीच केंद्रीय रसयान आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी लसनिर्मिती वाढवण्यासाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली होती याची मला कल्पना नव्हती,” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.
गडकरींचं नेमकं ट्विट काय आहे?
“स्वदेशी जागरण मंचच्या पत्रकार परिषदेत मी काल भाग घेतला. त्यावेळी कोरोना लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी मी सल्ला दिला होता. एका ऐवजी दहा कंपन्यांना लस निर्मितीचे लायसन्स द्या, असा सल्ला मी दिला होता. मात्र, हा निर्णय खते आणि रसायन मंत्रालयाने आधीच घेतला असून त्यावर कामही सुरू झाल्याचं मला माहीत नव्हतं. पत्रकार परिषदेनंतर मला त्याबाबत सांगण्यात आलं. 12 कंपन्यांनी लसीचं उत्पादन सुरू केल्याची माहिती मला देण्यात आली. मला त्याबद्दल माहीत नव्हतं. त्यामुळे मी सल्ला दिला होता. मात्र, केंद्र सरकारने आधीच योग्य पाऊल उचललं. त्याचा मला आनंदच आहे,” असं गडकरी यांनी म्हटलं आहे.
Yesterday while participating at the conference organised by Swadeshi Jagaran Manch, I had made a suggestion to ramp up vaccine production. I was unaware that before my speech Minister for Chemical & Fertilizers Shri @mansukhmandviya had explained government’s efforts to ramp up
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 19, 2021
गडकरी यांनी काल मीडियाशी संवाद साधताना हा सल्ला दिला होता. व्हॅक्सीनची मागणी वाढली आहे. त्यामुळे व्हॅक्सीन बनविणाचं लायसन्स एका कंपनी ऐवजी दहा कंपन्यांना दिलं पाहिजे. आधी या कंपन्यांना भारतात व्हॅक्सीनचा पुरवठा करू द्या. त्यानंतर व्हॅक्सीन जास्त असतील तर त्या निर्यात करा, असं गडकरींनी सांगितलं होतं.प्रत्येक राज्यात दोन तीन लॅब आहेत. त्यांना व्हॅक्सिनची निर्मिती करण्याची परवानगी द्या. केवळ सेवा म्हणून व्हॅक्सिनची निर्मिती करून घेऊ नका. तर त्यांना दहा टक्के रॉयल्टी देऊन व्हॅक्सिन निर्मिती करायला सांगा. 15 ते 20 दिवसात हे सगळं करता येऊ शकतं, असंही ते म्हणाले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.