HW News Marathi
महाराष्ट्र

“वीजबिलाबाबत अजित पवारांचा खोटारडेपणा बाहेर पडला”, प्रकाश आंबेडकरांचा थेट निशाणा  

सोलापूर | राज्यात वीज बिलाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. सामान्य लोकांच्या खिशाला न परवडण्यासारखी वीज बिलं दिली जात आहेत. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. वीजबिलाबाबत अजित पवारांचा खोटारडेपणा बाहेर पडला आहे. विधानसभेत त्यांना घेराव होऊ नये म्हणून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वीज तोडणार नाही असे आश्वासन दिले होते.

मात्र शेवटी पुन्ह वीज तोडणीवरील स्थगिती हटवली. पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांना संधी मिळाली आहे की त्यांनी खोटारड्या मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ते आज (२० मार्च) सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

नितीन राऊत हे दुबळे मंत्री असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वाढीव वीज बिलांसदर्भात ऊर्जा खात्याने ५० टक्के वीज बील माफीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र राऊत यावर ठामपणे भूमिका घेऊ शकले नाही. ते काँग्रेसचे दुबळे मंत्री त्यातही मागासवर्गीय असल्याने बारामतीकरांच्या पुढे ते जाऊ शकले नाही. या सर्वामध्ये बारामती अढथळा असल्याची टीका वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

दरम्यान वीज तोडणीसाठी कोणी आल्यास त्याला बडवा असे धक्कादायक आवाहन देखील प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केले. “कोणी वीज कापायला आले तर त्यांना बडवा, किती गुन्हे दाखल होतेत होऊ द्या. शासकीय गुन्हे चालवायला किती सरकारी वकील आहेत ?” असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आबेंडकरांनी वीज बील तोडणीला विरोध दर्शवला आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी वंचित उमेदवार देणार – प्रकाश आंबेडकर

आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. “पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या पंढरपुरात बैठक होणार आहे. ही निवडणूक सर्वांसाठी कठीण असणार आहे. आम्ही ही निवडणूक लढवणार आहेत.” अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिली आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुमच्यासारखे पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही; नवाब मलिक यांची राणेंवर टीका!

News Desk

जन्माने नाही, तर कर्माने व्यक्ती मोठी होते! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

“ढाई आखर” राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतस‍िंह कोश्यारी यांना प्रथम पारितोषिक

News Desk