HW News Marathi
देश / विदेश

दत्तात्रय होसबोळेंची संघ सरकार्यवाहपदी निवड

बंगळुरु | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंगळुरुमध्ये अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत हा निर्णय घेण्यात आला. दत्तात्रय होसबळे हे संघाचे २००९पासून सह-सरकार्यवाह म्हणून काम पाहत होते. दत्तात्रय होसबळे हे मूळ कर्नाटकमधील आहेत. त्यामुळे दत्तात्रय होसबळे यांनी संघाचे प्रचारक बनून पूर्णकालीन संघाचेच काम केले आहे. दत्ताजी होसबळे हे स्वतः त्यांच्या शिक्षणाच्या काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत होते.

त्यानंतर संघाने त्यांना जवळ जवळ १५ वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून काम केले. या काळात विद्यार्थी परिषदेचा देशाच्या पूर्वोत्तर भागापासून तर अंदमान निकोबार पर्यंत मोठा विस्तार झाला. ज्याचे श्रेय दत्तात्रय होसबळेंना दिले जाते. त्यामुळेच होसबळे यांना अनेक वेळा संघाचे तरुण नेतृत्व म्हटल्या जाते. गुवाहाटी येथील युवा विकास केंद्र स्थापन करण्यात देखील त्यांचा मोठा हात आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालकानंतर सरकार्यवाह हे दुसरे महत्त्वाचे पद आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि २०२५ ला संघ शताब्दी वर्षानिमित्त होणारे विविध कार्यक्रम लक्षात घेता संघ आणि भाजपा यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याच्यादृष्टीने सरकार्यवाहपदावर होणारी निवड महत्त्वपूर्ण मानली जात होती. कारण विद्यमान सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी दीर्घकाळ या पदावर काम करताना संघटनात्मक पातळीवर तसेच संघ -भाजपा समन्वयाच्या पातळीवरही योग्य भूमिका बजावली आहे.

अखेर शनिवारी बंगळुरू येथे झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत नवीन सरकार्यवाह म्हणून सध्याचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची निवड करण्यात आली. सरकार्यवाह हे संघातील दुसरं महत्त्वाचं पद असल्यानं होसबळे यांच्याबरोबरच डॉ. कृष्णगोपाल यांच्यासह इतरही सहसरकार्यवाहांच्या नावाची चर्चा होती. दत्तात्रय होसबळे हे २००९ पासून सहसरकार्यवाह म्हणून काम करत आहेत.

२०१२, २०१५ व २०१८ अशी सलग तीन वेळा भैयाजी जोशी यांची सरकार्यवाह म्हणून फेरनिवड करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिनिधी सभा दरवर्षी होते. तर दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. या सर्व बैठका नागपूरमध्ये म्हणजे संघाच्या मुख्यालयात पार पडतात, मात्र यंदा करोनामुळे नागपूरमधील परिस्थिती गंभीर आहे. नागपूरमध्ये लॉकडाउन लागू केलेला आहे. त्यामुळे ही बैठक बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आपल्याला मंत्रीपदासाठी ४२ वर्ष लागली, तुम्ही नशीबवान आहात,” दानवेंचा कराड आणि पाटलांना टोला?

News Desk

आज पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’, भारत-चीन तणावासह कोरोना अनलॉकविषयी बोलणार?

News Desk

नको ‘त्या’ आवस्थेत दिसलेल्या बॉयफ्रेंडवर महिलेचा चाकूहल्ला

News Desk