HW News Marathi
महाराष्ट्र

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन ‘त्या’ दिवशी भेटले, सीसीटीव्हीत भेट कैद

मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घऱाबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडलेल्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या ताब्यात असणारी अजून २ लक्झरी वाहनं जप्त केली आहेत. यामधील १ गाडी रत्नागिरीमधील शिवसेना नेता विजयकुमार भोसले यांच्या नावावर रजिस्टर असून दुसरी गाडी मर्सिडीज बेन्झ ही आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. राज्यात सध्या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण प्रचंड तापलं आहे. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागणार अशा चर्चाही सुरु झाल्या आहेत.

यादरम्यान एनआयए आणि एटीएसने सीसीटीव्हींची तपासणी केली असता १७ फेब्रुवारीला हिरेन आणि वाझे यांच्यात फोर्टमध्ये जीपीओजवळ मर्सिडीज कारच्या आत १० मिनिटं चर्चा झाल्याचं समोर आलं आहे. हिरेन ओला कॅबने दक्षिण मुंबईत गेले होते. आपली स्कॉर्पिओ मुलूंड -ऐरोली रोडला बंद पडल्याचा दावा त्यांनी केला होता. सीसीटीव्हीमध्ये सचिन वाझे आपलं कार्यालय असणाऱ्या मुंबई पोलीस मुख्यालयातून मर्सिडीजमधून बाहेर पडताना दिसत आहेत. यानंतर त्यांचं वाहन सीएसएमटीबाहेर सिग्लजवळ उभं असल्याचं दिसलं आहे. सिग्नल सुरु झाल्यानंतर मर्सिडीज त्याच जागी उभी असते आणि वाझेंनी पार्किग लाईट सुरु करुन ठेवलेली असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे.

काही मिनिटांनी मनसुख हिरेन रस्ता ओलांडून येतात आणि मर्सिडीजमध्ये बसतात. यानंतर मर्सिडीज जीपीओच्या समोर उभी असल्याचं दिसत आहे. जवळपास १० मिनिटं तिथे गाडी पार्क होती. यानंतर हिरेन गाडीतून बाहेर पडतात आणि गाडी पुन्हा पोलीस मुख्यालयात प्रवेश करताना दिसत आहे. मनसुख हिरेन यांनी सीएसएमटीला ज्या ओला कॅबने प्रवास केला त्याच्या चालकाने एटीएसला दिलेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान हिरेन यांना पाच वेळा फोन आला. वाझे यांनी हा फोन केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, हिरेन यांना पोलीस मुख्यालयासमोर रुपम शोरुमजवळ भेटण्यास सांगण्यात आलं होतं. पण नंतर शेवटच्या फोनला जागा बदलून सीएसएमटी करण्यात आली अशी सूत्रांची माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रातील जनतेची एकजूट व निर्धाराच्या बळावर सीमाभागाचा आणि कोरोनाविरुद्धचा लढा जिंकणारच

News Desk

संभाजी भिडे गुरूजींना मुख्यमंत्री पाटीशी घालत आहेत | राजा ढाले

News Desk

ख्रिसमस अन् नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागणार; आज नवी नियमावली जाहीर होणार

Aprna