HW News Marathi
Covid-19

मी भारत बायोटेकचा प्रकल्प पुण्याला पळवलेला नाही, ते न्यायालयाचेच आदेश !

मुंबई । “पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा भारत बायोटेक कंपनीला कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्याचे खुद्द मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी पार पाडली”, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (१७ मे) भाजपकडून होणारे आरोप फेटाळून लावले आहेत.

अजित पवार याबाबत बोलताना म्हणाले की, “भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कुठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता. त्यामुळे ‘हा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवला’ हा भाजप आमदार कृष्णा खोपडे यांचा आरोप तद्दन खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, प्रसिद्धीसाठी, राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे”, असे अजित पवार म्हणाले.

उच्च न्यायालयाकडूनच पुण्यात प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश !

राज्याचा उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण ही जबाबदारी पार पडल्याचे सांगत अजित पवार म्हणाले की, “भारत बायोटेकने स्वत:हून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळण्याबाबत मागणी केली होती. त्यासाठी, भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या ‘इंटरवेट इंडिया प्रा लि.’ (बायोवेट) कंपनीची जागा मिळावी असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली व दाद मागितली. उच्च न्यायालयाने कोरोनाचे संकट व लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले”, असे अजित पवार यांनी सांगितले.

…तरी माझ्यासह प्रत्येक महाराष्ट्रवासियाला आनंदच झाला असता !

“देशातील नागरिकांना कोरोनावरील लस लवकर उपलब्ध व्हावी हाच हेतू आहे. पुणे, नागपूरसह राज्याच्या कुठल्याही विभागात हा लसनिर्मिती प्रकल्प झाला असता तर माझ्यासह प्रत्येक महाराष्ट्रवासियाला आनंदच झाला असता. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी खोटे बोलून नागरिकांची दिशाभूल करु नये”, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मतदारसंघामध्ये कोरोनाबद्दल जनजागृती अभियानात चव्हाणांना जाणवल्या अडचणी, मुख्यमंत्र्यांकडे केल्या ‘या’ मागण्या

News Desk

नवाब मालिकांचे पालकमंत्रीपद दुसऱ्या एखादया कार्यक्षम व्यक्तीला द्या ! बच्चू कडूंच्या पक्षाची मागणी

News Desk

काय नुसता गोंधळ लावलाय ?सरकारच्या नविन नियमामुळे चित्रा वाघ संतापल्या !

Arati More