HW News Marathi
Covid-19

देशांत कोरोना रुग्णांची संख्या वाढली, गेल्या २४ तासांत ३५ हजारांच्यावर नवे रुग्ण

नवी दिल्ली | देशाच्या काही भागांमध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी जलद व निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (१७ मार्च) राज्यांना केले. ‘चाचणी करा, रुग्णशोध घ्या व उपचार करा’ या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला. कोरोनास्थिती आणि लसीकरणाबाबत मोदी यांनी काल राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. ‘

या दरम्यान रुग्णसंख्येने देशवासियांची चिंता वाढवली आहे.गेल्या २४ तासांत देशात ३५ हजार ८७१ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. डिसेंबरपासून ही आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यासोबतच करोना रुग्णसंख्या १ कोटी १४ लाखांवर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात काल तब्बल २३ हजार १७१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशातील ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी टाटा ग्रुपचा पुढाकार, पंतप्रधानांनी केलं कौतुक

News Desk

पवारांच्या साताऱ्यातील बैठकीत शिवेंद्रराजेंची हजेरी, चर्चांना उधाण

News Desk

कोरोना परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्याबद्दल मुंबई महापालिकेचं नीती आयोगाकडून कौतुक

News Desk