HW News Marathi
Covid-19

राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हिंगोली | काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राज्यसभेचे खासदार दिवंगत राजीव सातव यांचे आज सकाळी पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे त्यांच्या निवासस्थानी काल (१६ मे) सायंकाळी रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात आले आहे.

दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज (१७ मे) कळमनुरी येथे सकाळी साडेदहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली आहे.

आज सकाळी ७ वाजेपासून ९.३० वाजेपर्यंत नागरिकांना खासदार सातव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मिळणार आहे. कोरोनाचे संकट असल्यामुळे कोरोना संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेऊन व कोरोनाविषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच नागरिकांनी अंत्यदर्शन करावेत.मास्क, सॅनिटायझर, व सोशल डिस्टंसिंग यांचा वापर केल्याशिवाय कोणालाही अंत्यदर्शन मिळणार नाही.

अंत्यदर्शनास येणाऱ्या नागरिकांनी मास्क व सॅनिटायझरचा वापरूनच अंत्यदर्शन करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिवंगत खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतील ११ जिल्हे १७ मेपर्यंत रेड झोनमध्ये राहणार

News Desk

राज्यात रुग्ण बरे होण्याच्या संख्येत विक्रमी वाढ, एकाच दिवशी ४१६१ रुग्णांना घरी सोडले

News Desk

Unlock 1.0 | मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा एकदा वाहनांची गर्दी

News Desk