मुंबई । “नितीनजी धन्यवाद…बरं झालं तुम्ही सगळ्यांचे कान टोचलेत”, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. यावेळी नितीन गडकरी गालातल्या गालात हसले. काहीच दिवसांपूर्वी नागपूर भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलताना नितीन गडकरी यांनी आपल्याच नेते आणि कार्यकर्त्यांचे काम टोचले होते. “कोविड काळात राजकारण करू नका”, असे सांगत नितीन गडकरी यांनी राजकारणाचा खरा अर्थ सांगितला होता. इतकेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन नितीन गडकरी यांनी सर्व नेते-कार्यकर्त्यांना सुनावले होते.
नितीन गडकरी यांनी आपले नेते आणि कार्यमार्त्यांना दिलेल्या याच सल्ल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले. “नितीनजी धन्यवाद. बरं झालं काही दिवसांपूर्वी तुम्ही सगळ्यांचे कान टोचलेत. मीही सुरुवातीपासून सांगतो आहे की कोरोनाच्या ह्या काळात राजकारण करू नका. उलट ह्या काळात आपण एकत्र येऊन काम करायला हवे. आधी जीव महत्त्वाचा आहे. ह्या एवढ्या काळानंतर काय पुढे राजकारण करायचेच आहे”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरी यांचे आभार मानले. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी या कारणासाठी आभार मानल्यावर नितीन गडकरी देखील गालातल्या गालात हसले.
काय म्हणाले होते नितीन गडकरी ?
आपले नेते आणि कार्यकर्त्यांना सल्ला देताना नितीन गडकरी म्हणाले होते की, “कोविड काळात राजकारण करू नका. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजे असं नाही. तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करू नका. एकाच ऑक्सिजन सिलेंडर ४ जण फोटो काढतात हे चांगले नाही. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण म्हणजे राजकारण आहे.”
“नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच त्याचा भाग नाही, यावेळी गरिबांच्या मागे, समाजामागे धर्म, पक्ष विसरून मदत करा. त्याचे फळ पक्षाला नक्की मिळतं. वाईट काळात कार्यकर्त्यांच्या मागे राहिलो तर ते कधीच विसरत नाही. राजकीयदृष्ट्या विरोधक असले तरी सगळ्यांच्या मागे उभं राहणं सामाजिक दायित्व आहे. मला कोविड होत नाही म्हणून काहीजण गाफील राहतात. आजही अनेक नगरसेवक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी कोविडमध्ये बेफिकिरपणे वागतायत”, असेही गडकरी म्हणाले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.