HW News Marathi
देश / विदेश

DHFL प्रकरणी ED कडून सुशीलकुमार शिंदेंच्या मुलगी आणि जावयाची संपत्ती जप्त

नवी दिल्ली | DHFL मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाचे नाव पुढे येत आल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कपिल आणि धीरज वाधवानसंबंधीत असलेल्या या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुशील कुमार शिंदे यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची कमर्शियल संपत्ती ED ने जप्त केली आहे. ही जप्त केलेली संपत्ती अंधेरी पूर्व येथील कालेडोनिया बिल्डिंग येथे असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आता यापुढची कारवाई काय असणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

DHFL कंपनीचे प्रमोटर वाधवान बंधु देखील या प्रकरणी अटकेत असून ED कडून त्यांचीही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. PMC बँकेने DHFL दिलेले 3,688.58 कोटींचे कर्ज फ्रॉड घोषित केले आहे. त्याचप्रमाणे, या कंपनीची YES बँकतही कर्ज घोटाळ्याबाबत चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणी, EDने बँकेचे माजी प्रमुख राणा कपूर आणि DHFLचे कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांची 2400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. याच्याशी संबंधित प्रकरणात आता सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावई अडचणीत सापडले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना EDने ‘या’ प्रकरणी बजावली नोटीस

Aprna

अरुणाचल प्रदेशाच्या सीमेवर भारत-चीन सैन्यात झटापट

Aprna

राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा! – अजित पवार

Aprna