HW News Marathi
महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा! | नाना पटोले

मुंबई | राज्यात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्याची गरज असून सर्वांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून देऊन कामाला लागावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. गांधी भवन येथे सोमवारी (१५ मार्च) नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की,

“काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावा-गावात जाऊन पक्षाची भूमिका व सरकार करत असलेले काम पोहोचवावे काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल”

नाना पटोले यावेळी बोलताना म्हणाले की, “काँग्रेस पक्ष सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस महत्वाचा घटक पक्ष आहे. कठीण परिस्थिती असतानाही सरकारने एका वर्षात जनतेसाठीचे कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीनंतरची मदत यासह कोरोना काळातही उत्तम काम केले आहे. सरकारची ही कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे. तसेच केंद्रातील मोदी सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून महागाई प्रचंड वाढली आहे. लोकांचे जगणे कठीण झाले आहे. सर्व सरकारी कंपन्या विकल्या जात आहेत. भाजपा सरकारच्या या लोकविरोधी कारभाराला लोक कंटाळले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गावा-गावात जाऊन पक्षाची भूमिका व सरकार करत असलेले काम पोहोचवावे काँग्रेस पुन्हा एकदा राज्यात नंबर एकचा पक्ष बनेल.”

पुढे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलताना म्हणाले की, काँग्रेस पक्षाचा विचार हाच शाश्वत विचार असून तोच देशाला तारणारा आहे. काँग्रेस हा संविधानाला व लोकशाहीला माननारा पक्ष असून समाजातील सर्वांना ताकद देणारा पक्ष आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार लोकांच्या हिताचे निर्णय घेत असून लोकांपर्यंत सरकारचे काम पोहोचवा. विधान परिषदेच्या निवडणुका तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने चांगली कामगिरी केली असून अशीच कामगिरी आगामी निवडणुकांमध्ये करण्यासाठी सज्ज रहा, असे थोरात म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनगर आरक्षणाच्या आंदोलकांची प्रकृती खालावली

News Desk

कोस्टल रोडचे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घेण्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे निर्देश

Aprna

निरा डावा कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचे महाजनांचे आदेश

News Desk