मुंबई । मुंबईतील कोरोनास्थिती अत्यंत दिलासादायक आहे. शहरातील कोरोनारुग्ण बरे होणाऱ्यांचा दर वाढला आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा वेळही चांगलाच वाढला आहे. एकीकडे कोरोनास्थिती नियंत्रणात असताना दुसरीकडे मुंबईत लसीकरणही सुरू आहे. मात्र, याच लसीकरणावरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेला सणसणीत टोला लगावला आहे. “लसींपेक्षा पोस्टर्स जास्त आहेत. शिवसेनेच्या पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत का?” असा खोचक सवाल झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेला केला आहे.
झिशान सिद्दीकी यांनी याबाबत थेट ट्विट केले आहे. मुंबईतील लसीकरण केंद्राजवळील शिवसेनेच्या चार पोस्टर्सचे फोटोज शेअर करत झिशान सिद्दीकी म्हणाले की, “वांद्रे पूर्व भागातील शिवसेनेच्या भव्य लसीकरण उत्सवात आपले स्वागत आहे. येथे लसींपेक्षा पोस्टर्स जास्त आहेत. शिवसेनेच्या पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत का? कारण मला कुठेही महाविकास आघाडीचा उल्लेख दिसत नाही. लसीकरण केंद्रांच्या उद्घाटनाचे उदात्तीकरण थांबवा, हे आपले कर्तव्य आहे!” असे बोचरा सल्लाही झिशान सिद्दीकी यांनी शिवसेनेला दिला आहे.
Welcome to the Grand vaccination utsav by Shiv Sena in Bandra East. There are more posters than vaccines here. Are vaccines being bought by Shiv Sena personal party fund as I don’t see any mention of MVA anywhere? Stop glorifying openings of vaccination centres, this is our duty! pic.twitter.com/AFM3cyNBcs
— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) May 13, 2021
अनिल परबांवरही साधला होता निशाणा
झिशान सिद्दीकी यांनी यापूर्वीही ट्वीटरच्या माध्यमातून शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला होता. “माझ्याच मतदारसंघात लसीकरण केंद्र सुरू होत असताना प्रोटोकॉल म्हणून मला या कार्यक्रमाला निमंत्रित करणं अपेक्षित होतं. मात्र मला जाणीवपूर्वक डावलण्यात आलं. आपण लसीकरणातही राजकारण करत आहोत का?”, असा थेट सवाल झिशान सिद्दीकी यांनी अनिल परब यांना टॅग करून विचारला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.