इस्राईल | पॅलेस्टाईनमधील दहशतवादी गट असलेल्या हमासकडून इस्रायलवर गेल्या तीन दिवसात १५०० पेक्षा जास्त रॉकेट हल्ले करण्यात आले आहेत. त्यामध्ये शेकडो नागरिक जखमी झाल्याचा दावा इस्रायलने केला असून आता हमासला जशास-तसं उत्तर दिलं आहे. इस्रायलनेही गाझा पट्टीवर प्रतिहल्ला करुन हमासच्या ११ कमांडरना मारल्यांचं वृत्त समोर येत आहे. इस्रायलच्या या हल्ल्यात ७० पॅलेस्टिनी नागरिकांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय.
३ दिवसांपूर्वी जेरुसलेम तीन मोठ्या स्फोटांनी हादरलं होतं. जेरुसलेमच्या वेस्ट वॉलजवळ ज्यू धर्मीय प्रार्थना करत असताना हमासकडून रॉकेट हल्ला करण्यात आला. त्यामध्ये नऊ मुलांसह २० जणांचा मृत्यू झाल्याची बातमी होती. जेरुसलेम मधील अल-अक्सा मशिदीजवळ इस्रायल पोलीस आँणि पॅले्स्टिनी नागरिकांच्यात झटापट झाली होती. त्यामध्ये शेकडो नागरिकांचा जीव गेल्याची भीती व्यक्त करण्यात येते.
दरम्यान, या घटनेनंतर आता इस्रायल-पॅलेस्टाईन वाद पुन्हा उफाळला असून पॅलेस्टाईनचा दहशतवादी गट असलेल्या हमासने १५०० हून जास्त रॉकेट इस्रायलच्या दिशेने सोडली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या हवाई दलाने गाझा पट्टीवर बॉम्बचा वर्षाव सुरु केला. या दोन देशातील तणावावर संयुक्त राष्ट्राने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता पश्चिम आशियात पुन्हा एकदा युद्धसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.