HW News Marathi
Covid-19

भारत बायोटेकच्या Covaxin लसीची 2 ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणीची शिफारस

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या या लढाईत आता मुलांसाठी येत्या काही दिवसात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. एका तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकची कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस केली आहे.

दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी ही शिफारस करण्यात आली आहे. सूत्रांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. ही चाचणी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधील मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट, दिल्ली तसंच पाटण्यातील एम्ससह विविध ठिकाणी केली जाणार आहे.

2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये सुरक्षा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच इतर गोष्टींचं आकलन करण्यासाठी कोवॅक्सिन डोसच्या दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी परवानगी देण्याची विनंती भारत बायोटेकने केली होती.

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था म्हणजेच सीडीएससीओच्या कोविड-19 विषयक तज्ज्ञ समितीने काल (११ मे) भारत बायोटेकच्या विनंतीवर विचारविनिमय केला. त्यानंतर समितीने प्रस्तावित दुसरे/तिसरे टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केल्याचा माहिती मिळत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेत कोरोनावर पहिली लसी, प्राथमिक चाचणीचा निकाल आशादायक, ‘मॉडर्ना’ कंपनीचा दावा

News Desk

कोरोना लसीकारणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा-राजेश टोपे

News Desk

बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह, थोरात होम क्वारंटाईन

News Desk