HW News Marathi
Covid-19

निलेश लंकेच्या कोविड सेंटरला थेट परदेशातून मिळाली मदत!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे सध्या चर्चेचा विषय ठरलेले आहेत. पारनेरमध्ये उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये आमदार निलेश लंके रात्रंदिवस रुग्णांच्या सेवेसाठी इथेच मुक्काम करत आहेत. निलेश लंके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने हे कोविड सेंटर उभारले आहे..आता याची महती संपूर्ण जगभरात पसरताना दिसत असून, जगभरातून मदतीचा हात या कोविड सेंटरसाठी पुढे केला जात आहे.

निलेश लंके यांनी उभारलेल्या 1 हजार 100 बेडच्या भव्य कोविड सेंटरमधील 100 बेडला ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरला केवळ परदेशातून 1 कोटी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. निस्वार्थी भावनेने काम केलं तर हजारो हात देणारी असतात, असं मत निलेश लंके यांनी व्यक्त केलं.आतापर्यंत पॅरिस, दुबई, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, पोलंड आणि कॅनडा या देशातून आर्थिक मदत मिळाली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत पाच हजाराहून अधिक लोकांनी मोफत उपचार घेऊन सुखरुप घरी परतले तर आता दुसर्‍या लाटेत 14 एप्रिलपासून सुरु केलेल्या या कोविड सेंटरमध्ये 2,500 लोक उपचार घेऊन घरी परतले आहेत. सध्या एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निलेश लंके यांच्या कामांची दखल घेत लोकांचे काळजी घेताना स्वत:ची काळजी घेण्यास सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच निलेश लंकेंनी चक्क या कोविड सेंटरमध्ये मुक्कामदेखील केला आहे. रात्री बेरात्री एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागली किंवा अन्य औषधांची गरज भासली तर ते इथेच उपलब्ध राहून तात्काळ रुग्णाला मदत करतात.तसेच, कोविड सेंटरमध्येच जमिनीवर झोपलेल्याचं दिसून आलं होतं.

याचीच स्तुती करत “कोरोना संकटात आमदार नीलेश लंके यांनी केलेले कार्य पाहिल्यानंतर राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही,” असे गौरवोद्‌गार आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कृतिसमितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी आज काढले आहेत.

“आपलं काय व्हायचं ते होऊ द्या. जर मी घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं. माझी लोकं सुरक्षित असली पाहिजेत,”असं म्हणत लंके हे दिवसरात्र कोरोनाबाधितांच्या सेवेत झटत आहेत. त्यांच्या या कामाची दखल आता जगभरातून घेतली जात आहे. त्यामुळे याचा अंत चांगलाच होवा आणि राज्य, देश, जग कोरोनामुक्त होवो हीच इच्छा!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत पाटील यांनी सांगलीला पाठवले ५० हजार मास्क..

Arati More

महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्याने ३१ मेपर्यंत वाढवला लॉकडाऊन

News Desk

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचे समर्थन ! | नाना पटोले

News Desk