HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील जलसंधारण विभागात २ शिफ्टमध्ये काम होणार

मुंबई | एकीकडे राज्यात, मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. काही जिल्ह्यात लॉकडाऊन लावला आहे तर काही ठिकाणी तशी वेळ आली आहे. दरम्यान, मुंबईत ही कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. राज्याचा कारभार ज्या मंत्रालयात चालतो त्या मंत्रालयातील मंत्री, कर्मचारी देखील कोरोनाबाधित झाले आहेत.अशा वेळी राज्यातील जलसंधारण विभागाने एक वेगळं पाऊल उचलले आहे. ते म्हणजे मंत्रालयात त्या विभागात दोन शिफ्टमध्ये कामकाज करण्यात येणार आहे.

जलसंधारण विभागाने सकाळी ८ ते दुपारी ४ आणि दुपारी बारा ते रात्री आठ अशी शिफ्ट केलेल्या आहेत. यामध्ये विभागातील कर्मचाऱ्यांना वाटून शिफ्ट देण्यात आल्या आहेत. यामध्ये एका कर्मचाऱ्याला वर्क फ्रॉम होम करण्याची देखील मुभा देण्यात आली आहे. मंत्रालयात येणारे कर्मचारी यांना लोकल ट्रेन बस मधून प्रवास करावा लागतो. त्या गर्दीत ही कोरोना धोका कायम आहे. एकाचवेळी अनेक कर्मचारी असण्यापेक्षा दोन शिफ्ट मध्ये कर्मचारी विभागून जलसंधारण विभागाने एक प्रयत्न केला आहे.

१५ मार्चपासून या दोन शिफ्ट मध्ये कामकाज चालणार आहे. यामुळे कामावर काही परिणाम होतो का हे देखील पाहावं लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलून काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण मंत्रालयात पहिल्यांदाच अशा पद्धतीने शिफ्ट मध्ये काम करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर इतर विभागातही शिफ्ट मध्ये काम करता येईल का हा विचार करण्यात येणार आहे. पण सुरुवात सध्या तरी जलसंधारण विभागाने केली आहे.

मंत्रालयात दोन शिफ्टमध्ये काम

जलसंधारण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयात सामाजिक अंतराचे पालन करणे. तसेच गर्दी टाळण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासकीय कार्यालयातील उपस्थिती नियंत्रित करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

मंत्रालयात येणारे अनेक कर्मचारी हे लोकल ट्रेन, बस यासारख्या सार्वजनिक वाहनांमधून प्रवास करतात. या गर्दीत कोरोनाचा धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक कर्मचाऱ्यांनी एका शिफ्टमध्ये काम करण्यापेक्षा दोन शिफ्टमध्ये काम करण्यात येणार आहे. या सूचनेनुसार मृद आणि जलसंधारण या प्रशासकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन उपस्थितीच्या वेळेत बदल करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विकृत बुद्धीचे चाळे करु नका, भाजपला मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष टोला!

News Desk

अफगाणिस्तानबाबत भारताची भूमिका काय? SCO बैठकीत पंतप्रधान मोदींनी केलं स्पष्ट!

News Desk

भाजपमध्ये ताकद असेल तर गुजरातचे नाव बदलून कर्णावती करून दाखवा, राष्ट्रवादीचे आव्हान

News Desk