HW News Marathi
देश / विदेश

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा तृणमूलमध्ये दाखल

कोलकाता | अटल सरकारमध्ये अर्थमंत्री आणि परदेश मंत्री म्हणून जबाबदारी हाताळणाऱ्या यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसची वाट धरली आहे. आज (१३ मार्च) दुपारी यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर यशवंत सिन्हा दीर्घकाळापासून सक्रीय राजकारणातून दूर होते.

आज सकाळी यशवंत सिन्हा कोलकाताला दाखल झाले. इथे त्यांनी तृणमूल काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांच्याकडून दिनेश त्रिवेदी यांच्या जागेवर यशवंत सिन्हा यांना राज्यसभेत धाडलं जाऊ शकतं. ‘ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये जो हल्ला झाला. तो टिपिंग पॉईंट होता. तेव्हाच मी तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होण्याचा आणि ममतांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला’, असं स्पष्टीकरण यशवंत सिन्हा यांनी दिलं.

‘अटल बिहारी वाजपेयींच्या काळात भाजपचा सर्वसाधारण सहमतीवर विश्वास होता परंतु, आजच्या सरकारचा केवळ दडपशाही आणि जिंकण्यावर विश्वास आहे. अकाली दल, बीजेडी देखील भाजपमधून वेगळे झाले आहेत. आज भाजपसोबत कोण उभं आहे?’ अशी टीका यावेळी यशवंत सिन्हा यांनी भाजपवर केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…म्हणून भाजपचं कौतुक केलंच पाहिजे!”,राऊतांनी भाजपला डिवचले

News Desk

गोरक्षकांच्या हिंसेवरून संसदेत गदारोळ

News Desk

हा हल्ला करण्यासाठी हिज्बुलच्या अतिरेक्याने मला ५० हजार रुपये दिले !

News Desk