HW News Marathi
Covid-19

अहमदनगरमधील लॉकडाऊन ५ दिवसांनी वाढवला, आता अजून कडक निर्बंध लागू

अहमदनगर | अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी ७ दिवसांचे ‘कडक’ ‘लॉकडाऊन’ जाहीर केले होते. त्याची मुदत आज संपल्याने आयुक्तांनी त्याला पुन्हा एकदा पाच दिवसांची मुदतवाढ जाहीर केली आहे.

त्यामुळे नगरमध्ये आता १५ मे पर्यंत लॉकडाऊन असेल. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. किराणा तसेच भाजी विक्रीही बंद राहणार असून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११ यावेळेत सुरू राहणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात दरोरोज साडेतीन ते चार हजाराच्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ही साखळी तोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच प्रशासनाने ५ मे ते १९ मेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. तो लॉकडाऊन आता वाढवण्यात आला आहे.

कोरोना रुग्णसंख्या दरोरोज झपाट्याने वाढत असल्या बेडची कमतरता भासत आहे. तर नगरला ऑक्सिजन देखील तुटवडा निर्माण झाला होता, सध्या काही प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता झाली असली तरी कधीही कमी पडू शकतो, त्यासाठी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आला आहे. तर इतर खासगी ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात आले आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला आणि ७ कोरोना रुग्णांचा झाला मृत्यू

News Desk

साताऱ्यात १७ जुलै पासून पुन्हा लॉकडाऊन ! जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद राहणार?

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ६५,००२ नवे रुग्ण तर ९९६ रुग्णांचा झाला मृत्यू

News Desk