HW News Marathi
Covid-19

निम्म्या महाराष्ट्रात लॉकडाऊन! १५ मे नंतर लॉकडाऊन वाढणार?

मुंबई | राज्यात काही अंशी रूग्ण संख्या घटताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये कडक लॉकडाऊनचा परिणाम म्हणून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होऊ लागल्याचे सुलक्षण दिसू लागल्याने राज्यभरात हा लॉकडाऊन आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे ठिकठिकाणी वाढत्या रुग्णसंख्येनुसार कडक लॉकडाऊनचे निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आल्याने लॉकडाऊन झालेली शहरे आणि जिल्हे यांची संख्या आता २१ पर्यंत पोहोचत आहे.

१० मेपासून सिंधुदुर्ग, परभणी आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने नाशिक जिल्ह्यातही ११ दिवसांचा कडक लॉकडाऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी जाहीर केला. नाशिकपेक्षा कमी रुग्णसंख्या असूनही सातारा, सांगली, वाशिमसारख्या जिल्ह्यांनी पूर्ण लॉकडाऊन केले आहे. नाशिक जिल्ह्याची रुग्णसंख्या घटवण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे, असे ते म्हणाले आहेत.

लातूर, बदलापूर, वर्धा, सांगली, सातारा, कोल्हापूर, बीड, नांदेड, वासिम, अमरावती, यवतमाळ, अकोला, इंदापूर, बारामती, पंढरपूर या ठिकाणी सध्या कठोर लॉकडाऊन सुरू आहे. मुंबईत कठोर निर्बंध सुरू आहेत. आता लॉकडाऊन झालेल्या शहर आणि जिल्ह्यांची संख्या २१ पर्यंत जात आहे. तसेच, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही लॉकडाऊन वाढवला जाण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला. मुंबईसह महाराष्ट्रात आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन झाल्यास त्याचा आणखी चांगला परिणाम दिसेल, असा दावा त्यांनी केला आहे.

लॉकडाऊनचा चांगला परिणाम दिसत असल्याने 31 मेपर्यंत तो वाढवावा, असे मत आघाडीतील अनेक मंत्र्यांनी व्यक्त केले आहे. आज (११) मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात 65 हजारावर रुग्णसंख्या होती. लॉकडाऊनमुळेच ही प्रगती झाली असल्याचे मत अनेक मंत्र्यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. दररोज 10 ते 11 हजारावर पोहोचलेली रुग्णसंख्या आता 2 हजाराच्या खाली आली आहे. काल (१० मे) मुंबईत 1,794 रुग्णांची नोंद झाली. तर 74 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 3,580 रुग्ण बरे होऊन घरी परतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ७,८६२ नवे कोरोना रुग्ण आढळले, २२६ जणांचा झाला मृत्यू

News Desk

धक्कादायक! नवी नवरीच निघाली कोरोना पॉझिटिव्ह, तर वऱ्हाडी झाले क्वारंटाईन

News Desk

“महाराष्ट्र मॉडेलचा वापर करा, अन्यथा देशातील कोरोना नियंत्रणात येणार नाही”, राऊतांचा इशारा

News Desk