HW News Marathi
Covid-19

पुणेकरांना दिलासा, पुण्यात लॉकडाऊन होणार नाही!

पुणे | राज्यात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा एकदा वाढायला लागली आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती वाढण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या पुन्हा झपाट्याने वाढताना दिसत आहे. दरम्यान, पुण्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने लॉकडाऊनची भीती होती. मात्र, पुणेकरांना दिलासा देणारी ही बातमी आहे. पुण्यात लॉकडाऊन करणार नसल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आज (१२ मार्च) पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली होती.

काय असणार पुण्यात नियम –

  • शाळा, कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंदच असणार आहेत.
  • कडक निर्बंध लावले जाणार आहेत.
  • हॉटेल रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे.
  • रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी कायम असणार आहे.
  • ऑफिसेस त्यांच्या वेळेनुसार सुरु राहणार
  • नियमांचे पालम केले नाही तर कडक कारवाई देखील करण्यात येणार आहे.
  • शाळा, कॉलेज बंद असले तरी कोचिंग क्लासेसमध्ये ५० टक्के मुलांना परवानगी देण्यात आली आहे.
  • मॉल सिनेमागृह रात्री १० पर्यंतची सुरु राहणार आहे.
  • रात्री ११ वाजेपर्यंत जेवणाची होम डिलेव्हरी सुरु राहणार
  • दशक्रिया, लग्न समारंभ, अंत्यविधीसाठी ५० लोकांचीच मर्यादा असणार
  • मॉल, मार्केट रात्री १० वाजता बंद होणार
  • खुल्या जागेत १०० लोकांची मर्यादा असणार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

८ तासांनंतर मास्क बदलणं गरजेचं, केंद्र सरकारने जारी केली Home Quarantine साठी नवी नियमावली

News Desk

मुंबईच्या लोकल बंद करण्याबाबत सरकारचा कोणताही विचार नाही! – राजेश टोपे

Aprna

महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा केंद्र सरकारचा रडीचा डाव । अनिल परब

News Desk