HW News Marathi
Covid-19

पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको, पुणे व्यापारी संघाची पालकमंत्र्यांकडे मागणी!

पुणे | पुण्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप पाहायला मिळत आहे. काही दिवसांनंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने उसळी घेतली आहे. दररोज हजारच्या वरती रुग्णसंख्या मिळत असल्याने पुण्यात लॉकडाऊनच्या चर्चा सुरु आहेत. अशावेळी पुण्यात कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको, अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाने उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

गेल्या वर्षभर कोरोनाने सगळ्यांनाच हैरान केलं आहे. त्यातही पुण्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रुादुर्भाव पाहायला मिळाला. अगदी महाराष्ट्रातले सर्वाधिक कोरोना रुग्ण पुण्यात मिळाले. याच पार्श्वभूमीवर पुण्यात अतिशय कडक निर्बंध लादले गेले. कित्येक व्यापाऱ्यांची दुकाने पाच ते सहा महिने बंद होती. आता कुठे व्यवसाय पुन्हा रुळावर येतो ना येतो तोच पुन्हा एकदा कोरोनाने उसळी घ्यायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावले तरी चालतील पण आता लॉकडाऊन नको, अशी विनंती पुणे व्यापारी महासंघाने अजित पवार यांच्याकडे केली आहे.

पुणे व्यापारी महासंघाने अजित पवार यांना यासंदर्भातलं एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये आपली व्यथा मांडत गेल्या वर्षभरातले व्यापाऱ्यांचे हाल त्यांनी पत्राच्या माध्यमातून अजित पवारांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच दुकाने बंद असल्याने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं सांगत आता पुन्हा आमच्यावर लॉकडाऊनचा घाव घालू नका, अशी विनंती महासंघाने केली आहे.

पत्रात काय म्हटलं आहे?

“कोरोनामुळे पुण्यातील व्यवसाय सुमारे सात ते आठ महिने बंद होते. त्यामुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कुठे व्यवसायाला सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत पुन्हा लॉकडाऊन झाल्यास व्यापार्‍यांचे प्रचंड मोठे नुकसान होईल. त्यामुळे पुण्यात हवं तर कडक निर्बंध लावा मात्र लॉकडाऊन नको”, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी पत्रातून मांडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार धैर्यशील माने यांनी क्वारंटाईनसाठी दिले स्वत:चे घर

News Desk

कोविड-१९ आजाराने मृत पावलेल्यांच्या २ हजार ११६ वारसांना प्रत्येकी ५० हजारांची मदत! – अमित देशमुख

Aprna

कुंभमेळ्यात शाहीस्नानानंतर १०२ जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह

News Desk