मुंबई | MPSC च्या उमेदवारांना कोरोनाचा जोरदार फटका बसला आहे. आता पुन्हा एकदा १४ मार्चला होणारी MPSC ची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. एमपीएससीने परिपत्रक काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, राज्यात निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेतल्याचं या परिपत्रकावर नमूद करण्यात आलं आहे. परीक्षेच्या नव्या तारखा यथावकाश जाहीर करण्यात येतील, असं देखील या पत्रकामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे एमपीएससीच्या उमेदवारांची परीक्षेसाठीची प्रतिक्षा अद्याप संपत नसल्याचीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
एमपीएससी आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत. आयोगाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी परीक्षार्थी नांदेड शहरातील रस्त्यावर उतरले आहेत. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शहरातील आयटीआय परिसरात एकत्र येऊन रस्ता रोको केलाय. कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारने राज्यसेवा परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी हे करत आंदोलन सुरू केलं आहे.
यावरुन आता राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला महाविकासआघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचे आणखी एक कारण मिळाले आहे. महत्वाचं म्हणजे, या निर्णयाविरोधात महाविकासआघाडी सरकारमधीलच काही नेत्यांनी निषेध केला आहे. यावर आता महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाष्य केले आहे. ‘अनेक संकटांना मात करत विद्यार्थी हा परिक्षा करीता परिश्रम घेत असतो. जवळ आलेली MPSC ची परीक्षा झाली पाहिजे कारण विद्यार्थांचा भविष्य हे परीक्षा वर अवलंबून असतो.कोरोनाचे संपूर्ण नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरीता परीक्षा झाली पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे’, असे ट्विट त्यांनी केले आहे.
अनेक संकटांना मात करत विद्यार्थी हा परिक्षा करीता परिश्रम घेत असतो.
जवळ आलेली #MPSC ची परीक्षा झाली पाहिजे कारण विद्यार्थांचा भविष्य हे परीक्षा वर अवलंबून असतो.
कोरोना चे संपूर्ण नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरीता परीक्षा झाली पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे..— Nana Patole (@NANA_PATOLE) March 11, 2021
तर त्यांनी आणखी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाल्याचंही सांगितलं आहे. ‘आताच MPSC परीक्षा संबंधात मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं असून मुख्यमंत्री साहेबांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार’, आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय तोडगा काढणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
आताच #MPSC परीक्षा संबंधात माननीय मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्याशी माझा फोन कॉल द्वारा बोलणे झाले असून मुख्यमंत्री साहेबांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार असे आश्वासन दिले आहे. https://t.co/9UVP7dacky
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 11, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.