HW News Marathi
Covid-19

शिवसेनेने कोकणाला वाऱ्यावर सोडले आहे का? भाजपचा सवाल !

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अद्यापही चिंताजनकच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही ठिकाणी अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. आज आपण मुंबई, पुण्यातील रुग्णसंख्येबाबत बोलत आहोत. मात्र कोकणातील परिस्थितीचे काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडले आहे का? असा थेट प्रश्न भाजप प्रदेश उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे.

कोकणाने आजवर शिवसेनेला काय नाही दिले? पण या कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकारने कोकणाला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे,असा आरोप त्यांनी केला आहे. सिंधुदुर्गआणि रत्नागिरीतील परिस्थिती आज चिंताजनक आहे. सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत १५,१६६ रुग्ण बाधित झाले असून ११,००० रुग्ण बरे झाले आहेत. आजघडीला सिंधुदुर्गमध्ये ३६७५ रुग्ण अॅक्टिव्ह असून केवळ १०१५ इतकीच बेड्सची व्यवस्था आहे. तसेच रत्नागिरीत सध्या २७,६७७ रुग्ण असून १९,४४८ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७७७२ रुग्ण उपचार घेत असून त्यांना बेड्सची कमतरता भासत आहे.

आरटीपीसीआर बाबतही हीच परिस्थिती आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात. मात्र तरीही जिल्ह्यांत ही भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. गावागावातील सेवाभावी संस्था कोकणवासीयांची सेवा करत आहेत. मात्र यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक, आमदार कुठेही दिसत नाहीत, असा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केला. दरम्यान, सिंदुधुर्ग आणि रत्नगिरीतील ही परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी, अशी विनंती प्रसाद लाड यांनी केली आहे. सर्व आमदार, खासदारांसह विडिओ कॉन्फरन्सद्वारे का असेन पण एकदा तरी कोकणाची आढावा बैठक घ्यावी, असे मत भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगभरातील कोरोना बाधितांची संख्या ७२ लाखांवर पोहोचली

News Desk

खासदार नवनीत राणा यांच्या प्रकृतीत सुधारणा

swarit

आज राज्यात ३२५४ कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, तर १८७९ रुग्णांना डिस्चार्ज

News Desk