HW News Marathi
Covid-19

मोदींकडून देशातील कोरोना स्थितीचा आढावा, लसीकरण मोहीम जलद करण्याच्या सूचना

नवी दिल्ली | देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येसोबतच मृत्यूदरातही झपाट्यानं वाढ होत आहे. कोरोनामुळे ओढावलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील परिस्थितीचा सर्वसमावेशक आढावा घेतला. यादरम्यान, त्यांनी देशातील राज्यांची आणि जिल्ह्याची कोरोना परिस्थिती जाणून घेतली.

याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी ज्या राज्यांतील परिस्थिती अत्यंत बिकट आहे, त्या-त्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधानांनी तेलंगणा, आँध्रप्रदेश, ओडिशा आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली.

देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना पंतप्रधानांना त्या राज्यांबाबात माहिती देण्यात आली, जिथे 1 लाखांहून अधिक रुग्ण आहेत. तसेच पंतप्रधानांना कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित असणाऱ्या देशातील जिल्ह्यांबाबतही सांगण्यात आलं. पंतप्रधानांना राज्यांद्वारे आरोग्य सेवा मजबूक करण्यासाठी केल्या जाणाऱ्या तयारीसंदर्भातही माहिती दिली गेली.

तप्रधानांनी पुढिल काही महिन्यांमध्ये लसीचं उत्पादन वाढवण्यासाठी लसीकरण आणि रोडमॅपची प्रगती यासंर्भात आढावा घेतला. पंतप्रधानांना यासंदर्भात सांगण्यात आलं की, राज्यांना जवळपास 17.7 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी लसीच्या अपव्ययांबाबतचा राज्यवार आढावा घेतला. तसेच पंतप्रधानांनी सांगितलं की, 45 वर्षांवरील व्यक्तींच्या लोकसंख्येच्या जवळपास 31 टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच यावेळी पंतप्रधानांनी लसीकरणासाठी काही सूचनाही केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेमडेसिविरच्या नावे दिले पॅरासिटामॉलचे पाणी, बारामतीत ३५ हजारांना बनावट इंजेक्शनची विक्री

News Desk

मंत्रालयात आणखी एका आणखी एका प्रधान सचिवांना कोरोनाबाधित

News Desk

देशात गेल्या २४ तासांत आत्तापर्यंतची सर्वाधिक रुग्णांची वाढ !

News Desk