HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीसांनी अधिवेशन गाजवलं! गृहखात्यावर अनिल देशमुखांपेक्षाही घट्ट पकड?, ‘ठाकरे सरकार’ बॅकफूटवर

राज्याच्या विधानसभेत मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचे पडसाद अत्यंत गंभीरपणे उमटले आहे. राज्यातील विरोधी पक्ष महाविकासआघाडीची कोंडी करण्यात यशस्वी ठरल्याचे कालच्या दिवसभरात अधिवेशनात पाहायला मिळालं. मुख्यतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांचा सीडीआर, त्यांच्या पत्नीचा कबुली जबाब आदी गोष्टींचा उल्लेख करून जाहीररित्या सभागृहात मांडून सत्ताधाऱ्यांना पुरतं कोंडीत पकडंल. यावेळी, सत्ताधाऱ्यांना आपली योग्यरीत्या आपली बाजूही सावरता आली नाही आणि जो प्रयत्न झाला तो केविलवाणा ठरला. देवेंद्र फडणवीसांनी थेट मनसुख हिरेन प्रकरणी सीडीआर मिळवला? ते सभागृहात सांगितलं आणि सीडीआरच काय तर प्रकरणातील सर्व पुरावे तुमच्यासमोर आणून मांडेन असं थेट आव्हान देत सत्ताधाऱ्यांना आपल्या ताकदीबाबत इशारा दिला. काल सभागृहात या प्रकरणावरून चांगलीच खडाजंगी उडाली आणि अनेक चर्चांना उधाण आलं. मिळवण्यास अत्यंत कठीण असा सीडीआर अर्थात कॉल डिटेल्स रिपोर्ट फडणवीसांना कसा मिळाला ? त्यांनी तो कसा मिळवला ? आणि कसाही मिळवला असेल तरीही यातून देवेंद्र फडणवीस यांची गृह खात्यावर पकड किती घट्ट होती हे आता सत्ता गेल्यावर पण दिसून येतेय. विद्यमान मंत्र्यांपेक्षा माजी मंत्र्यांची गृहविभागवर असलेली हि पकड फडणवीसांची क्षमता दाखवतेच पण महाविकासाआघाडीसाठी धोक्याची घंटाही ठरते.

#DevendraFadnavis #AnilDeshmukh #UddhavThackeray #HomeMinistry #HomeMinister #MVA #MVAGovernment #MahaVikasAaghadi #Maharashtra #SharadPawar #SachinVaze #MansukhHiren

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OIC conference and India | OIC मधील भारताचं जाण योग्य ?

News Desk

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर Sandeepan Bhumare यांची प्रातिकिया

Seema Adhe

सीमेवरील मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर सक्तीचे कुटुंब नियोजन

News Desk