HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरातील ‘गोकुळ’च्या मतमोजणीला झाली सुरुवात 

कोल्हापूर | राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळच्या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. आज (४ मे) सकाळी ८ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. १८ टेबलांवर ३६३९ मते मोजली जाणार आहेत. प्रत्यक्ष मतमोजणीला १० वाजता प्रारंभ होईल. त्यानंतर काही तासांत हा निकाल लागण्याची शक्यता आहे.

मतमोजणी केंद्रात उमेदवार आणि प्रतिनिधींना प्रवेश दिला जात आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात जोरदार चुरस असून मतदारांचा कौल कुणाच्या बाजुने याची उत्कंठा शिगेला पोचली आहे. रमणमळा बहुउद्देशीय हॉलमध्ये ही मतमोजणी सुरू असून येथे कडक पोलिस बंदोबसत तैनात केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २ मे लाा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली. २१ जागांसाठी दोन्ही गटांचे ४५ उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतपत्रिका वेगळ्या करून त्या विभागनिहाय एकत्र केल्या आहेत.

१८ टेबलांवर ही मतमोजणी केली जाणार आहे. २५ मतांचे गठ्ठे केले जात आहेत. प्रथम राखीव गटांतील मतमोजणी होईल. या गटांत पाच जागा असून महिला राखीव, एस. सी., एन. टी आणि ओबीसी प्रवर्गातील मतमोजणी होईल. महिला राखीव गटात सत्ताधारी गटातून शौमिका महाडिक आणि अनुराधा पाटील तर विरोधी गटातून सुश्मिता पाटील आणि अंजना रेडेकर उमेदवार आहेत. ही मतमोजणी टेबल क्रमांक एक ते टेबल क्रमांक ९ वर सुरू आहे.

इतर मागासवर्गीय मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक १० ते १२ टेबलवर होणार आहे. भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक एक ते १५ वर होणार आहे. अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक १६ ते १८ वर होणार आहे. राखीव गटातील मतमोजणी आणि निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वसाधारण गटातील मतमोजणीस सुरूवात होणार आहे.

मतमोजणीसाठी प्रवेश देताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड काळजी घेतली जात आहे. आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल दिल्यानंतरच प्रवेश दिला जात असून त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांची लगबग वाढत होती. त्यामुळे या निवडणूकीत बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अटक आणि जामीन यासंदर्भात पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली का? त्यावर राणेंचं उत्तर!

News Desk

सातारच्या गादीचा अपमान सहन करणार नाही,उदयनराजेंच्या समर्थनार्थ शंभूराजे मैदानात !

News Desk

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

News Desk