HW News Marathi
महाराष्ट्र

‘नाणार प्रोजेक्ट’ प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंना कृष्णकुंजवर आज भेटणार

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढाकारामुळे आता रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा (मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काल (७ मार्च) राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊन देऊ नका, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्य सरकारने गुंडाळलेल्या नाणार प्रकल्पाची फाईल पुन्हा उघडणार असल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर आज (८ मार्च) नाणारमधील काही प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी ही बैठक पार पडेल. त्यासाठी नाणारचे प्रकल्पग्रस्त रविवारी रात्रीच बसने मुंबईला रवाना झाले. थोड्याचवेळात साधारण ११ वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण कृष्णकुंजवर पोचणार असल्याचे म्हटले जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नाणार पंचक्रोशीतील जवळपास १०० प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची भेट घेतील. यापैकी बहुतांश जण हे जमीन मालक आहेत. याशिवाय, नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे अध्यक्षही या बैठकीला उपस्थित राहतील. यावेळी राज ठाकरे यांच्यापुढे नाणारमधील तब्बल ८५०० जमीन मालकांची संमतीपत्रेही सादर करण्यात येतील. त्यामुळे आता राज ठाकरे नाणारच्या मुद्द्यावरुन आक्रमक होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलं आहे?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. ‘नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही. राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर या प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमिका घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

सरकारने नाणारबाबत सकारात्मक भूमिका घेतली तर मी आणि माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. एवढंच नव्हे तर पर्यावरण आणि पर्यटनाच्या अनुषंगाने एक विकास आराखडा तयार करून आम्ही तो आपणांस सादर करू, असं सांगतानाच सद्यपरिस्थितीत महाराष्ट्र राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठी असे निर्णय घेणं ही काळाची गरज आहे. कोणी काहीही म्हणू दे .. महाराष्ट्र फर्स्ट .. असं धडाकेबाज धोरण असायला हवं, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमचा पक्ष जातीयवादी नाही- जयंत पाटील

swarit

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढण्यास प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त – राजेश टोपे

News Desk

भाजपचा दणका, आयुक्तांकडून स्थायी समितीतील ६५० कोटींचा फेरफार रद्द

Aprna