HW News Marathi
देश / विदेश

बंगालमध्ये निवडणुकींच्या रणसंग्रामाची तयारी ! मोदी,ममता बॅनर्जी यांच्या सभा,रोड शो…

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्राम सुरू होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशातल्या बड्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत. आज बंगालसह देशभरात मोठमोठ्या नेत्यांच्या रॅली, पदयात्रा, सभा होत असल्याने पॉलिटिकल सुपरसंडे अनुभवायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकातामधील ऐतिहासिक परेड ग्राऊंडमध्ये मोठी रॅली करणार आहेत. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी महागाईविरोधात केंद्र सरकारविरुद्ध उत्तर बंगालमध्ये पदयात्रा काढणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगालच्या कोलकातामधील ऐतिहासिक परेड ग्राउंडमध्ये मोठी रॅली करणार आहेत. या रॅलीमध्ये पंतप्रधान मोदींसह यावेळी दिग्गज नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. या रॅलीत अभिनेते मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात आहे. मिथुन यांच्यासोबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, अभिनेता प्रोसेनजीतसह आणखी काही बंगालमधील प्रमुख व्यक्ती भाजप प्रवेश करतील अशी शक्यता आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी महागाईविरोधात केंद्र सरकारविरुद्ध उत्तर बंगालमध्ये पदयात्रा काढणार आहेत. गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा मुद्दा बनवत ममता बनर्जी आज सिलीगुडीमध्ये चार किलोमीटर लांब रोड शो करणार आहेत. ममता यांचा रोड शो आणि कोलकातामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली एकाच वेळी असणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज तामिळनाडू आणि केरळच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. आज ते भाजपच्या डोअर टू डोअर मोहिमेची सुरुवात करणार आहेत. अमित शाह तिरुवनंतपुरममध्ये भाजपच्या केरल विजय यात्रेच्या समारोप कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता ते त्रिवेंद्रपुरम मधील श्री रामकृष्ण मठात जातील. केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये 6 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी आज मेरठमध्ये कृषी कायद्याविरोधाती महापंचायतमध्ये सहभागी होतील. त्या मेरठमधील कैली गावात होणाऱ्या जय जवान-जय किसान “किसान महापंचायत” मध्ये संबोधित करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस अपयशी | नरेंद्र मोदी  

swarit

दिल्ली उच्च न्यायालयाला आज अर्ध्या दिवसाची सुट्टी 

News Desk

विरेंद्र सेहवाग प्रशिक्षकपदासाठी फेवरिट ?

News Desk