HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कंगनाच्या कार्यालयाची पाहणी

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. त्यातच आज (७ सप्टेंबर) मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंगना राणावतच्या पाली हिल परिसरातील कार्यालयाची पाहणी केली. मुंबई महापालिकेच्या नियमानुसार हे कार्यालय बांधले आहे का ?याचा आढावा यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी केला आहे.

३ अधिकारी आणि तीन कर्मचारी असलेलं ६ जणांचं पथक पाली हिलमधील कंगनाच्या कार्यालयात पोहोचलं. त्यांनी या संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. कंगनाच्या कार्यालयाला लागून असलेल्या इतर बंगल्यांचीही बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. एकूणच या मार्गावर बांधकाम रस्त्यावर आलं आहे का? इतर गोष्टी बेकायदेशीर आहेत का? बांधकामाबाबत काही त्रुटी आहेत का? याचा आढावा बीएमसीच्या पथकाने घेतला. काही ठिकाणी त्यांनी रस्त्याची मापंही घेतली आहेत.

दरम्यान, कंगणाने ट्विट करत याबाबत माहिती दिली. यात तिने असे लिहिले आहे की, माझ्याकडे या ऑफिसचे सर्व कागदपत्रे आहेत. मात्र आज पालिकेने अचानक पाहणी केली उद्या तोडून देखील टाकतील. मात्र, पालिकेने मला चुकीचे बांधकाम केले असेल तर ते दाखवावे, असेही तिने म्हटले आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1302900505933307905?s=19

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतरिम अर्थसंकल्पात दुष्पकाळ ग्रस्त शेतकऱ्यांसाठी २००० कोटीची तरतूद

News Desk

‘मुंबईमध्ये ड्रोन द्वारे जंतूनाशक फवारणी!’

News Desk

दहा लाख रूपये घेऊन तिकीट कट -सोशल मीडियावर विडीओ वायरल

News Desk