HW News Marathi
महाराष्ट्र

कंगना देशभक्त ठरत असेल तर Y कशाला तिला Z सुरक्षा द्या – विजय वडेट्टीवार

मुंबई | मुंबईला पाकव्याप्त भाग म्हणणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत विरुद्ध शिवसेना वाद अता जास्तच पेटला आहे. त्यात आता केंद्र सरकारकडून कंगना हिला Y प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कंगना रानावतवर टीका केली आहे.

‘कंगना रानावतने मुंबईला पाकव्याप्त भाग असल्याचे म्हटले होते. मुंबईला कुणी पाकव्याप्त भाग म्हणत असेल आणि त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे हे देशभक्तपणा आहे का?’ असा संतप्त सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितीत केला होता..’जर असं वक्तव्य करून कंगना देशभक्त ठरत असेल तर वाय कशाला तिला झेड सुरक्षा द्या. कंगना ही भाजपची पोपट आहेत’, अशी जळजळीत टीका विजय वड्डेटीवार यांनी केली. केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला आता Y प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. राज्य सरकारने या प्रकरणात घेतलेली भूमिका पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

‘जर त्या मुलीनं (कंगनानं) महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार केला जाईल. तिनं मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटलं, अहमदाबादविषयी असंच बरळण्याचं धाडस तिच्यात आहे का?’ असे राऊत म्हणाले होते. दरम्यान, ९ तारखेला कंगना मुंबईत आल्यावर काय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहूल गांधीच्या आणीबाणीच्या वक्तव्यारुन राजकारण तापले, भाजपनेही कॉंग्रेसला सुनावले

swarit

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

News Desk

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन

News Desk