HW News Marathi
महाराष्ट्र

“भाजप म्हणतंय की ठाकरे मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर”

मुंबई | जळगाव येथील गणेश कॉलनी भागातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मात्र वसतिगृहातील कथित घटनेसंदर्भात सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली असून, तेथे कोणतेही गैरकृत्य घडले नसल्याचा निष्कर्ष समितीने अहवालात काढला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल (५ मार्च) विधानसभेत दिली.

तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे निदर्शनास आले आहे. महिला वसतिगृह असल्याने तिथे पुरुष अधिकारी आत जाऊ शकत नाही. पोलिसांनी त्या कथित घटनेचा व्हिडीओ काढला असे सांगितले जात असले तरी असा कोणताही व्हिडीओ पुरावा म्हणून समितीला मिळाला नाही, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. मात्र अनिल देशमुख यांच्या या खुलासाबाबत भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.

जळगाव महिला वसतिगृहाच्या गैर प्रकाराबद्दल महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलेला खुलासा सुसंस्कृत महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारा आहे, असं अतुल भातखळकर यांनी ट्विटद्वारे सांगितले. तसेच मी म्हणालोच होतो ठाकरे मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर आहेत, असं सांगत ठाकरे सरकारला टोला देखील लगावला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अनिल देशमुखांबाबत आलेल्या बातम्यांबाबत सत्य काय आणि असत्य काय याचा सीबीआयने तात्काळ खुलासा करावा” – नवाब मलिक

News Desk

निजामुद्दीन तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यातील १८२ जणांची यादी, त्यापैकी १०६ पुण्यात आढळले !

swarit

‘सामना’च्या अग्रलेखातील गलिच्छ भाषेबाबत चंद्रकांत पाटील रश्मी वहिनींना पत्र लिहिणार

News Desk