HW News Marathi
Covid-19

मुंबईतील ‘या’ रेस्टोरंटमध्ये १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | मुंबई आणि महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट कायम आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज ७ ते ९ हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत असून, मुंबईतील दररोजची रुग्णासंख्याही १ हजार पेक्षा जास्तच आहे. सरकारकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात असतानाच मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये या सगळ्यांना दाखल करण्यात आलं आहे.मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, मुंबईतही करोनाचा प्रसार वाढला आहे.

दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध राधाकृष्ण रेस्टॉरंटमधील १० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अंधेरीतील राधाकृष्ण रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. या रेस्टॉरंटमध्ये ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या कर्मचाऱ्यांना बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून, इतरांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळे रेस्टॉरंट दोन दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. सॅनिटाइज केल्यानंतर आणि नवीन कर्मचारी आल्यानंतर पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहार पोलिसांना एकही पदक न मिळाल्याने महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना मोठे दु:ख !

Gauri Tilekar

देशात गेल्या २४ तासात ६७६७ रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ, तर १४७ जणांचा मृत्यू

News Desk

जयंत पाटील पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये, १४ दिवसांच्या क्वॉरंटाईन काळानंतर कामकाजाला केली सुरुवात

News Desk