HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या विरोधात कुणी षडयंत्र केले, या सगळ्याच्या व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहेत !

जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा तोफ डागली आहे. आपल्याविरोधात कसं षडयंत्र रचलं गेलं, याचा खुलासा त्यांनी केला आहे. माझ्याविरोधात कसं षडयंत्र रचले गेले. हे षडयंत्र कुणी केले?, कसे केले?, त्यात कोण कोण सामील होते?, कोणत्या मंत्र्याचे पीए होते?, याच्या व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडे आहेत, मी हे पुरावे वरिष्ठांना दाखवणार आहे. काही पुरावे मी यापूर्वीच वरिष्ठांना दाखवले आहेत, असं खडसे म्हणाले.

तसेच एका मंत्र्याचा पीए व एका महिलेचे नग्न फोटो देखील माझ्याकडे होते, ते देखील मी वरिष्ठांना दाखवून या मंत्र्याचे व त्याच्या जवळच्या लोकांचे काय काय उद्योग चालतात याची माहिती वरिष्ठांना दिल्याचं खळबळजनक वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. मी काय गुन्हा केला आहे??? हे मी वारंवार विचारत आहे. मी दोषी असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मीच विधानसभेत केली होती, याची आठवण देखील एकनाथ खडसे यांनी यावेळी करुन दिली.

दरम्यान, कालच त्यांनी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात टीका करू शकत नाही असे म्हटले होते. कारण मुहूर्त साधत लग्न केलं होतं आणि ४-५ दिवसांचा का होईना पण संसार केला होता असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे खडसे आणखी कोणते धक्कादायक खुलासे करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाड शहरातील नुकसानग्रस्त दुकानदारांना मदतीसाठी शॉपॲक्ट परवाना नसल्यास इतर पुरावेही ग्राह्य धरणार

News Desk

राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

News Desk

गरज पडल्यास अध्यादेश काढून डान्सबार बंद करू !

News Desk