HW News Marathi
देश / विदेश

तामिळनाडू निवडणुकीपूर्वी शशिकला यांची राजकारण सोडल्याची मोठी घोषणा

चेन्नई | तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय आणि एआयएडीएमके (AIADMK) च्या नेत्या व्हीके शशिकला यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शशिकला यांनी तुरुंगातून शिक्षा भोगून आल्यानंतर काही दिवसांतच हा निर्णय घेतला आहे. तर शशिकला या आगामी विधानसभा निवडणूक लढतील, असे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा भाचा टीटीव्ही दिनाकरण यांनी सांगितले होते.

शशिकला यांनी याबाबत एक निवेदन जारी केले असून आपल्या समर्थकांना आणि एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आणि डीएमके पक्षाला पराभूत करण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, “तामिळनाडूमध्ये एआयएडीएमकेचे सरकार बनावे म्हणून मी राजकारणातून संन्यास घेत आहे. मी पक्षाच्या विजयासाठी देवाकडे आणि माझी बहिण जयललिता यांच्याकडे प्रार्थना करते. मी नेहमीच तामिळनाडूच्या जनतेच्या भल्यासाठी काम करत राहणार आणि जयललिता यांच्या मार्गावर जाणार आहे. एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांनी एकजूट राहावे आणि डीएमकेला निवडणुकीत पराभूत करावे.

शशिकला यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, “जया (माजी मुख्यमंत्री जे जयललिता) जिवंत असतानाही मी कधीही सत्ता किंवा पदावर नव्हते. तिच्या मृत्यूनंतरही मी तसे करणार नाही. राजकारण सोडत असले तरी त्यांचा पक्ष विजयी झाला पाहिजे आणि त्यांचा वारसा पुढे जाईल अशी मी प्रार्थना करते.”त्या म्हणाल्या, की “मला कधीही सत्ता, अधिकार किंवा संपत्तीची इच्छा नव्हती. अम्मा (जयललिता) आणि तमिळनाडूच्या जनतेचे मी नेहमी कृतज्ञ आहे.”

एआयएडीएमकेचे निष्कासित नेत्या व्ही. के. शशिकला २८ जानेवारी रोजी एका बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात चार वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर बाहेर आल्या आहेत. तेव्हापासून अशी अटकळ होती की सत्तारूढ एआयएडीएमके आणि विरोधी पक्ष डीएमकेला यावेळच्या विधानसभा निवडणुकीत आव्हान देतील. अद्याप तरी त्यांनी आपले पत्ते खोलले नाही. जे जयललिता यांचे डिसेंबर २०१६ मध्ये निधन झाले. यानंतर एआयएडीएमकेमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली. अन्नाद्रमुकच्या पन्नेरसेल्वम गटाने शशिकला यांना पक्षातून काढून टाकले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्याने तिरंग्याचा अपमान केला त्याला पकडावं, टिकैत यांचा पंतप्रधानांवर पलटवार

News Desk

१५ कोटी वर्षापूर्वीचे डायनासॉरचे आवशेष सापडले

News Desk

शरद भाऊ ! पवारांनी दिला सुषमा स्वराज यांच्या आठवणींना उजाळा

News Desk