HW News Marathi
महाराष्ट्र

अत्याचार अत्यंत किळसवाणा, आरोपींना त्वरित कठोरात कठोर शिक्षा द्या – पंकजा मुंडे

मुंबई । जळगाव येथील सरकारी वस्तीगृहातील मुलींसोबत करण्यात आलेला अत्याचार अत्यंत किळसवाणा आहे. यात सरकारी अधिकारीही सामील असल्याचे समजते. यातील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.

जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वस्तीगृहात पोलिसांनीच तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदरील घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असुन जिल्हाधिकार्‍यांकडे या संबंधी तक्रार करण्यात आली आहे.

या प्रकरणात पोलिस कर्मचारी आणि वस्तीगृहाबाहेरील कांही पुरूष सहभागी असल्याचा आरोप असुन जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेशही दिले आहेत. या प्रकरणाचे विधीमंडळात देखील गंभीर पडसाद उमटले आहेत. दरम्यान, याबाबत पंकजा मुंडे यांनी हा प्रकार अत्यंत किळसवाणा आहे. यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी करणारे ट्विट केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या नियमांचा फज्जा ! पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

News Desk

महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी घातले श्रीगणरायांना साकडे

News Desk

तेच हिंदुत्व प्रबोधनकारांना अपेक्षित होते – सुशीलकुमार शिंदे

News Desk