HW News Marathi
महाराष्ट्र

परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपयांची खंडणी गोळा केल्याचे आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले होते.त्यानतंर अनिल देशमुखांविरोधात सीबीआय चौकशी चालु झाली,त्यांचं घर,कार्यालय यांवर छापोमारी झाली आणि अनिल देशमुखांविरोधात गुन्हाही दाखल झाला.त्यानंतर आता परमवीर सींग यांच्याही अडचणीत वाढ झालेली आहे.परमवीर यांच्यावर तब्बल २५ आरोप करत त्यांची तक्रपा पोलिस महासंचालक,गृहमंत्री आणु मुखयमंत्रयांकडे एका पोलिस अधिकाऱ्याने केली होती.त्यानंतर आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध 22 कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अकोल्याच्या पोलीस अधिकारी भीमराज घाडगे यांनी ही तक्रार केली आहे.

ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलिस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. या सोबतच परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलिस उपायुक्तांच्या डझनभर पोलिस अधिकार्‍यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह तब्बल २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून या प्रकरणाचा तपास आता ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त तसेच माजी गृहमंत्र्यांवर १०० कोटींचा हप्ता मगितल्याचा आरोप करणारे परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. भीमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामध्ये भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ व अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीचे आमदार, खासदार एक महिन्याचं मानधन पुरग्रस्तांना देणार, अजित पवारांची घोषणा

News Desk

नांदेडमध्ये भाजपला मोठं खिंडार! प्रदेश उपाध्यक्षाचा राजीनामा, लवकरच काँग्रेस प्रवेशाची शक्यता

News Desk

मुलांना शाळेत पाठवणे सक्तीचे नाही, ऑनलाईन शिक्षण चालू राहिल – प्राजक्त तनपुरे

News Desk