HW News Marathi
महाराष्ट्र

“कोरोना म्हणतोय मी पुन्हा येईन…”, पुन्हा येईन, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला    

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा (३ मार्च) तिसरा दिवस आहे. दरम्यान, आज अनेक विषयांवरुन विरोधक आणि सरकार यांच्यात चांगलीच शाब्दिक रंगत रंगली होती. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलेलं पाहायला मिळालं. दरम्यान, मुख्यमंत्री उद्द ठाकरे यांनी या सगळ्या विषयावर भाष्य करत भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतून देवेंद्र फडणवीसांसह भाजपावर निशाणा साधला. राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी उत्तर दिलं. यावेळी विरोधकांनी करोना परिस्थितीहून सरकारच्या कामावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना ठाकरे यांनी उत्तर दिलं. यावेळी ‘पुन्हा येईन… पुन्हा येईन’वरुन ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

“आपण फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला. मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावं? काय करू नये, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला. ज्या लोकांनी मला संपर्क केला. जो मला प्रतिसाद मिळाला, त्यात महाराष्ट्रातील जनता मला मानायला लागले. ही माझ्या आयुष्यातील मोठी कमाई आहे. पण, मी नेमकं काय करत होतो. आज जी परिस्थिती तयार झाली आहे, कोरोनाची पुन्हा दुसरी लाट येतेय की काय? अशी शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढतेय. लॉकडाउन करायचा की नाही. मी फेसबुक लाईव्हमधून तेच सांगत होतो. निष्काळजीपणा करू नका. कारण हा व्हायरस आहे. तो म्हणतोय मी पुन्हा येईन… पुन्हा येईन. काळजी घ्या. दुर्दैवानं थोडसं इकडेतिकडे झालं आणि व्हायरस पुन्हा परत आला,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

“माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेचा फायदा करोना लसीकरणामध्ये होत आहे. सध्या मी जबाबदार योजना राबवली जात आहे. सरकार काम करत आहे. देशातील सर्वात मोठं जंम्बो कोविड हॉस्पिटल सरकारनं राज्यात उभारलं. महाविकासआघाडी सरकारनं करोना काळात नागरिकांना ५ रुपयांना शिवभोजन थाळी दिली. आम्ही रिकाम्या थाळ्या वाजवल्या नाही. राज्यपालांनी सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे. विरोधकांनी नुसत्याच थाळ्या वाजवल्या,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडी सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता?

Aprna

मोहन डेलकरांच्या आत्महत्येची चौकशी SIT कडे सोपवली, गृहमंत्र्यांची घोषणा

News Desk

पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा विहिरीत बुडून मृत्यू 

News Desk