HW News Marathi
महाराष्ट्र

“शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला. बेणं पक्कं आहे, कच्चा नाही”, हर्षवर्धन यांनी मुलाचे कौतुक करत सासऱ्याला लगावला टोला   

औरंगाबाद | कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पत्नी संजना जाधव यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली. २००३ मध्ये चूक केली आणि भोगत आलो, असं म्हणत आपल्या लग्नाविषयी त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला, हे बेणं म्हणजे २०२९ चा आमदारच म्हणा ना, अशा शब्दात पुत्र आदित्य जाधव त्यांनी यांचंही तोंडभर कौतुक केलं आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड मतदारसंघात आयोजित सभेत आपली आगामी रणनीती जाहीर केली. “बाप जेलमध्ये घातला, तर पोरगा उठून उभा राहिला. त्यांना वाटलं याला घातला आतमध्ये, तर सरेल, इकडे मारुन घेऊ पूर्ण मतदारसंघ. पण मध्येच शिवबाची तलवार चमकली, कापला. शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला. बेणं पक्कं आहे, कच्चा नाही, २०२९ चा आमदारच म्हणा ना” असं म्हणत हर्षवर्धन जाधवांनी मुलगा आदित्य जाधवचं कौतुक केलं.

“मतदारसंघासाठी जाधव कुटुंब अविरत झटत राहणार. मधल्या काळात अत्यंत वाईट दिवस आले. लोक म्हणाले दादा तुम्हाला म्हातारपणात वेगळं सुचायला लागलं. मग पत्ते उघड झाल्यावर म्हणाले, तुमचं बरोबर होतं. हे नेहमीचं आहे. शिवणा टाकळीच्या आंदोलनातही धरणात गाडी ढकलली, तेव्हा लोक म्हणाले. बाप शांततेच्या मार्गाने लढला, पोरगा इतका डांबरट. पण मग काय झालं… हर्षवर्धन जाधव आमदार झाला.. मी तुमच्याशी, मतदारसंघाशी गद्दारी करणार नाही. कितीही संकटं आली, उलथापालथ झाली, अगदी हत्येचा प्रयत्न झाला, तरीही” अशी ग्वाही हर्षवर्धन जाधवांनी दिली आहे.“इथे आई आहे, इशा (मैत्रीण इशा झा) पण बसली आहे, म्हणून शब्द सांभाळतो. पण ते काय म्हणाले.. नाक घासडत आणला नाही तर नावाचा नाही अमका-तमका नाही. पुण्यातील जेलमधून बाहेर पडल्यावर मीही म्हणालो, तुम्हाला ठोकला नाही, तर नावाचा हर्षवर्धन नाही. तुम्ही आमच्या तालुक्यात झेंडे लावता आणि तुमच्या पोरीची बॅग धरायला लावला. मेलो तरी चालेल, पण आता झुकणार नाही.” असा इशारा हर्षवर्धन जाधवांनी रावसाहेब दानवेंना दिला आहे.

“खाजगी आयुष्यात मी २००३ ला चूक केली आणि भोगली”

“माझे वडील आयएएस ऑफिसर होते. कलेक्टर होते. ऐशोआरामाचं आयुष्य सोडलं आणि मातीत बसलेल्या माणसाला देव मानला. जिथे ज्वारी-बाजरी पिकत नव्हती, तिथे ऊस पिकवला. धरणं बांधली, कधी दारु वाटली नाही, पण पाणी आणलं, शेतकऱ्यांना समृद्ध केलं. यापुढे तुम्ही चुका करु नका. खाजगी आयुष्यात मी चूक केली. २००३ ला चूक केली आणि भोगली. पण आता नाही, यापुढे इथे रायभान जाधवांचीच संस्कृती चालणार” असा एल्गार हर्षवर्धन जाधवांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरसकट शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले उत्तर…

News Desk

लवादाच्या बाबत शरद पवारांचे मार्गदर्शन घ्यावे, पंकजा मुंडेंचा सल्ला!

News Desk

‘नारायण राणेंच्या दोन्ही मुलांना मारल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही’, सेनेच्या मंत्र्यांसमोरच इशारा!

News Desk