HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरातील भाजपचा ‘हा’ बडा नेता काँग्रेसमध्ये दाखल,चंद्रकांत पाटलांना धक्का!

कोल्हापूर | नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे पक्षांतर सुरुच आहे.कोल्हापुरातील भाजपच्या बडा नेत्याने काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गोपाळराव पाटील यांनी अवघ्या तीन वर्षात भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चा रंगल्या होत्या.

कोल्हापूरमध्ये भाजपला गळती सुरुच असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यातच गळतीला सुरुवात झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. चंदगड तालुक्यातील भाजपवासी झालेल्या गोपाळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसचा झेंडा हाती धरला आहे.

तीन वर्षांपूर्वी गोपाळराव पाटील यांनी काँग्रेसला अलविदा करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु वरिष्ठ नेत्यांनी पक्ष प्रवेशाच्या वेळी दिलेला शब्द पाळला नसल्याची नाराजी गोपाळरावांनी व्यक्त केली होती. ते गेल्या दिवसांपासून नाराज होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्ही काय कटोरा घेऊन त्या दिल्लीच्या दारामध्ये उभे आहोत?”, मुख्यमंत्री सभागृहात बरसले

News Desk

भाजपा नेत्यांवर ३०२ चे गुन्हे दाखल केले पाहिजेत; काँग्रेसची मागणी!

News Desk

अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू

News Desk