HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राठोड यांचा राजीनामा काय फ्रेम करुन ठेवण्यासाठी नाही- मुख्यमंत्री

मुंबई | मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. राजीनामा आला म्हणजे तो मंजूरच केला आहे. तो काय फ्रेम करून ठेवण्यासारखा नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी संजय राठोड प्रकरणावरून विरोधकांनी सुरू केलेल्या राजकारणावरही जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राठोड प्रकरणावर भाष्य केलं.

संजय राठोड यांनी स्वत:हून माझ्याकडे राजीनामा दिला आहे. पण विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे. तपास हा झाला पाहिजे. तो निष्पक्षपातीच असला पाहिजे. पण एखाद्याला लटकवायचं आणि आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

तुम्ही म्हणाल तसा तपास होणार नाही. तुम्ही तपासाला दिशा देऊ शकत नाही आणि तपासही भरकटवू शकत नाही, असा हल्लाही त्यांनी विरोधकांवर चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याचं सांगितलं. राजीनामा आल्यानंतर तो फ्रेम करून ठेवायचा नसतो. त्यामुळे तो स्वीकारण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

राठोड यांच्या खात्याचा भार कुणाकडे देण्यात आला? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर राठोड यांच्या खात्याचा पदभार माझ्याकडेच आहे. त्यांच्या खात्याचा कार्यभार सध्या मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे आहे. अधिवेशनात त्यांच्या खात्याशी संबंधित काही प्रश्न आल्यास मी त्याला उत्तर देईन किंवा त्या खात्याचे राज्यमंत्री उत्तरं देतील, असंही त्यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ खडसेंचा मुक्ताईनगरमध्ये धमाका, महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय

News Desk

सुनील तटकरेंचा ‘सेल्फी विथ खड्डा’

News Desk

मुंबईतून बाप-बेट्याचं सरकार हद्दपार करायचंय, नितेश राणेंचा हल्लाबोल

News Desk