HW News Marathi
महाराष्ट्र

…म्हणून उध्दव ठाकरे यांनी केला राज ठाकरे यांना नमस्कार!

मुंबई | राज्यात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. तिच्या आत्महत्येला राजकिय वळण आले कारण यात शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव समोर आले. दरम्यान, संजय राठोड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वनमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. याच मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत सगळ्या विषयावर भाष्य केले.

कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना तुम्ही मास्क का घालत नाही? अशी विचारणा पत्रकारांनी केली होती. त्यावर राज ठाकरे असं म्हणाले होते की, “मी मास्क घालतचं नाही”.यावर आज (२८ फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारणा करण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, “त्यांना माझा नमस्कार”, असं म्हटलं. त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्री राज्यात कोरोना रूग्ण संख्या पुन्हा वाढत असल्याने काळजी घेण्यास सांगत आहेत, मास्क घालण्यास सांगत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र मास्क घालतच नाहीत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदनगर-सोलापूर राष्ट्रीय मार्गावर अपघात, २ जणांचा जागीच मृत्यू

News Desk

कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत लवकरच समावेश, विधिमंडळात ठराव मांडणार; धनंजय मुंडेंची मोठी घोषणा

News Desk

गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, किरीट सोमैय्यांची मागणी

News Desk