HW News Marathi
महाराष्ट्र

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नवा लूक पाहिलात का?

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात सलून, पार्लर बंद असल्यामूळे घरच्याघरीच लोकांनी नवीन स्टाईल करुन पाहिल्या. यात सर्वसामान्यांपासून, कलाकार आणि काही राजकीय नेत्यांची देखील नवा लूक ट्राय केला. अशातच, कायम आपल्या बोलण्याच्या तडफदार शैलीने चर्चेचा विषय असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही एक नवा लूक सध्या लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.विशेष म्हणजे अगदी महिनाभरापूर्वी आपल्या आधीच्या लूकमध्ये दिसणारे राज ठाकरे अचानक नव्या लूकमध्ये दिसत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या त्यांच्या काही फोटोंमधून हे समोर आलं आहे.

लॉकडाऊनमध्ये सलून बंद असताना कोणी वाढलेल्या केसांची अनोखी स्टाईल केली, तर कोणी घरच्या घरी केस कापले होते.गॉगल आणि टीशर्ट घातला असतानाचा राज ठाकरे यांच्या काही फोटोंनी त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. राज ठाकरे यांच्या नव्या फोटोंमध्ये त्यांनी दाढी वाढवलेली दिसत आहे. त्यामुळे कायम क्लीन शेवमध्ये दिसणारे राज ठाकरे हटके लूकमध्ये दिसत आहेत.

https://www.facebook.com/407529622782440/posts/1596164487252275/

 

मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये राज ठाकरेंनी मेकओव्हर केलेला दिसत आहे. राज्यातील विविध संघटनांमधील प्रमुख कार्यकर्त्यांनी मनसेत काल प्रवेश केला. त्याचे फोटो मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आले. यात राज ठाकरे यांनी सफेद कुर्ता आणि नेहमीचाच चष्मे घातलेला दिसत आहे. मात्र, त्यात त्यांची फ्रेंच कट दाढी चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांचा हा नवा लूक त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीला नक्कीच उतरत आहे.

https://www.facebook.com/407529622782440/posts/1595478710654186/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतिम वर्ष परीक्षांच्या तारखा घोषित! घरात बसून देता येणार परिक्षा…

News Desk

अशा परिस्थितीत कारवाई केल्याने लोकांच्या मनात शंका – शरद पवार

News Desk

मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नका – उदयनराजे भोसले

News Desk