HW News Marathi
Covid-19

देशात कोरोनाचा नको असलेला विक्रम! २४ तासांत ३ लाख ४६ हजारांच्यावर आढळले रुग्ण

नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या प्रसाराचा वेग प्रचंड असून, रुग्णवाढही वेगाने होत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३,४६,७८६ रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसांत आढळून आलेल्या रुग्णांचा हा जागतिक उच्चांक असून दिवसेंदिवस परिस्थिती आणकी बिकट होत चालली आहे. देशात २४ तासांत अडीच हजारांहून अधिक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४६ हजार ७८६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात २४ तासांच्या काळातच २ लाख १९ हजार ८३८ जण करोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत १ लाख ८९ हजार ५४४ जणांचा मृत्यू झाला असून, देशात सध्या २५ लाख ५२ हजार ९४० रुग्ण उपचार घेत आहेत.

 

तर दुसरीकडे महाराष्ट्रात ६७,०१३ नवे रुग्ण आढळले असून ६२,२९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत ३,३३,०७४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३४ टक्के झाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१५ मार्चपर्यंत भारतात कोरोना नाही असा मोदी सरकारचा दावा होता – जितेंद्र आव्हाड

News Desk

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकरांची कोरोनावर यशस्वी मात !

News Desk

कोरोना लसीच्या वाटपात गैरव्यवस्थापन, महाराष्ट्रासोबत दुजाभाव का?

News Desk