मुंबई | माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी साहेबांच्या निधनानं भारतीय राजकारणातील सर्वमान्य, सर्वसमावेशक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ, अनुभवी, विद्वान्, सुसंस्कृत, मार्गदर्शक नेतृत्वाचं निधन ही देशाची, भारतीय राजकारणाची मोठी हानी आहे. डॉ. मनमोहसिंह यांच्यासारख्या अर्थतज्ञ पंतप्रधानांच्या काळात देशाचं अर्थमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळून त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली होती.
माजी राष्ट्रपती,भारतरत्न डॉ.प्रणव मुखर्जी साहेबांच्या निधनानं भारतीय राजकारणातील सर्वमान्य,सर्वसमावेशक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे.त्यांच्यासारख्या ज्येष्ठ,अनुभवी,विद्वान,सुसंस्कृत,मार्गदर्शक नेतृत्वाचं निधन ही भारतीय राजकारणाची मोठी हानी आहे.त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/cTNATZRZYn
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 31, 2020
महत्वाच्या मुद्यांवर देशातील राजकीय नेतृत्वामध्ये समन्वय साधून प्रश्न सोडवण्याचं कौशल्य आदरणीय प्रणवदांकडे होतं. त्यांचं निधन ही देशाची, महाराष्ट्राची, माझी व्यक्तिगत हानी आहे. देशाच्या या महान नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.